29 September, 2016

ग्रंथप्रदर्शन स्पधा परीक्षेबाबत  मार्गदर्शन
हिंगोली, 29 :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या निमित्ताने आज ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने श्री.पी.एन.दोनकलवार, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय हिंगोली. यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करुन प्रास्ताविकात कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
       यावेळी पी.एन.दोनकलवार,सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय हिंगोली यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेबाबत मार्गदर्शन केले. अभ्यास कसा करावा, गटचर्चा तसेच स्पर्धापरिक्षेबाबत सुत्राचा कसा वापर करावा याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
 तसेच त्यांनी स्वत:चे स्पर्धापरिक्षेबाबतचे अनुभव विद्यार्थ्याना सांगीतले. तसेच विद्यार्थ्यांशी  चर्चा करुन त्याचे स्पर्धापरिक्षेबाबत शंकाचे समाधान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आभार प्रदर्शन प्र.त्रिं.पाटील, तांत्रिक सहाय्यक यांनी केले.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थींनी यांच्यासह कार्यालयाचे श्री.पुनसे, श्री.कापसे यांची उपस्थिती होती. 
***** 
सन 2016-2017 शिष्यवृत्ती मंजूरीकरिता 
महाविद्यालयानी अर्ज सादर करावीत
--- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

          हिंगोली, दि. 29 :-  सन 2015-2016 चे अपात्र त्रुटीची पूर्तता करुन अर्जाच्या मुळ प्रती फेर सादर करणे. तसेच ऑनलाईन अर्ज, सन 2016-2017 करीता महाविद्यालयातील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती करीता नवीन अर्ज भरणे तसेच जुन्या विद्यार्थ्यांचे अर्ज नुतणीकरण करणे. प्राचार्यांची डिजीटल सिग्नेचर केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे. महाविद्यालयास आजपर्यंत (सन 2016-2017 सह) असलेल्या शासन मान्यतेच्या प्रती आणि विद्यापीठ संलग्नीकरणाच्या प्रती सादर करावी. सन 2016-2017 करीता प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी लिंक झाल्याचे बँकेचे प्रमाणपत्र सादर करावीत. सन 2016-2017 करीता नवीन अर्ज भरणे व अर्जाचे नुतणीकरण करणे. सन 2016-2017 चे फिस स्ट्रक्चर शिक्षण मंडळ, विद्यापीठ किंवा शिक्षण शुल्क समितीच्या आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राच्या आवश्यक प्रतीसह सादर करुन ऑनलाईन फिस स्ट्रक्चर भरणे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्जांच्या मुळ प्रती आवश्यकता त्या कागदपत्रासह बी स्टेटमेंटनुसार सादर करावीत.
            उपरोक्त कार्यवाही केल्याशिवाय सन 2016-2017 मध्ये कोणत्याही महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मंजूर होणार नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यलयाचे प्राचार्य यांची राहील, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी कळविले आहे.   

***** 
आदिवासी सेवक व आदिवसी सेवा संस्था पुरस्कार
सन 2015-2016 व 2016-2017 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 29 :- महाराष्ट्र राज्यात आदिवासी कल्याणाच्या / विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस तसेच सामाजिक संस्था अनुक्रमे आदिवासी सेवक व सेवा संस्था यांना अनुक्रमे आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
            त्यानुसार आदिवासी सेवकासाठी सन 2015-2016 व 2016-2017 या वर्षाकरिता अनुक्रमे 15+15 असे एकूण 30 आदिवसी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था यांना सन 2015-2016 व 2016-2017 चा वर्षाकरिता अनुक्रमे 7+7 असे एकूण 14 आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देण्याचे विचाराधीन आहे.
            याकरिता महाराष्ट्र  राज्यात आदिवासी कल्याणाच्या / विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच सामाजिक संस्थांनी अनुक्रमे आदिवसी सेवक आदिवासी सेवा संस्था पुरस्कारासाठी विहीत नमुन्यात अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडून माहे सप्टेंबर, 2016 अखेर आवश्यक त्या कागदपत्रासह पुराव्यासह सादर करावेत.
            आदिवसी सेवक व संस्था पुरस्कार योजनेचा विहीत अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्र तसेच या योजनाची तपशिलवार माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांनी कळविले आहे.

*****

28 September, 2016

जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धा संपन्न

हिंगोली, दि. 28 :- क्रिडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोशिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्क्वॅश रॅकेट शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील स्पर्धा जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र स्क्वॅश हॉल येथे घेण्यात आल्या. याप्रसंगी तहसिलदार हिंगोली विजय अवधाने यांनी उद्घाटन केले. तर जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, किशोर पाठक, संजय बेत्तीवार, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी प्रशिक्षक गोपाल इसावे, सचिव संतोष नांगरे, सुनिल कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

*****
जिल्ह्यात शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

हिंगोली, दि. 28 :-  क्रिडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा स्पोर्टस कराटे डो असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा प्रशिक्षण क्रिडा संकुल हिंगोली येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून तहसिलदार विजय अवधाने तर अध्यक्ष जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी भूषविले. तर प्रमुख उपस्थितीत किशोर पाठक, संजय बेत्तीवार, अन्सारी, जिल्हा स्पोर्टस कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल इसावे, सचिव संतोष नांगरे यांची उपस्थिती होती. स्पर्धेत 14, 17 व 19 वर्ष वयाच्या जिल्ह्यातील शालेय मुला-मुलींना सहभाग नोंदविला.
शालेय मुला, मुलींना स्पर्धेत खेळत असताना जय-पराजय होतच असतो तो खेळाचा भाग असतो तो खेळाचा भाग असतो. म्हणून पराजय झाल्यास खचुन जाऊ नये जोमाने तयारी करून यश संपादन करावे. विशेषत मुलींनी ही कला आत्मसात करावी. व स्व:ताचे रक्षण करत निर्भयतेने जगावे. असे मत तहसिलदार अवधाने विजय यांनी व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वीतेकरिता पंच म्हणून सुनिल कांबळे, अमोल ढगे, विक्की इसावे, हर्षद खरे, बालाजी शिंदे, धनंजय धुळधुळे, नवनाथ बांगर, कु. संपना नागरे यांनी कामगिरी बजावली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका संयोजक रामप्रकाश व्यवहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बेत्तीवार क्रिडा अधिकारी यांनी मानले.

*****

 
माजी सैनिकांना ईसीएचएस मार्फत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 28 :- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवांसाठी दि. 30 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता मिल्ट्री हॉस्पीटल, औरंगाबाद येथे ईसीएचएस (माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजना) मार्फत देण्यात येणाऱ्या लाभाविषयी / अडी-अडचणीबाबत मिटींग ठेवण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पेंशनधारक माजी सैनिक / विधवांनी आपल्या काही तक्रारी / अडी-अडचणी असतील तर स्वत: सदरील मिटींगमध्ये उपस्थित राहुन आपल्या समस्येचे समाधान करून घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

27 September, 2016

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत 5 ऑक्टोबरला
हिंगोली, दि.27: राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी  प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला असून, नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती (जागांच्या आरक्षणाचे पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नूसार अनुक्रमे निवडणुक विभाग व निर्वाचक गण प्रसिध्दी करण्यापुर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेवून अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग  प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखुन ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी पुढीलप्रमाणे सोडत पध्दतीने कार्यवाही करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
अ.क्र.
जिल्हा परिषदेचे नाव / पंचायत समितीचे नाव
सभेचे ठिकाण
सभेची वेळ व तारीख
1
जिल्हा परिषद, हिंगोली
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
2
पंचायत समिती, हिंगोली
तहसिल कार्यालय, हिंगोली
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
3
पंचायत समिती, कळमनुरी
तहसिल कार्यालय, कळमनुरी
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
4
पंचायत समिती, सेनगाव
तहसिल कार्यालय, सेनगाव
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
5
पंचायत समिती, औंढा (ना.)
तहसिल कार्यालय, औंढा (ना.)
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
6
पंचायत समिती, वसमत
तहसिल कार्यालय, वसमत
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
जिल्हा परिषद, पंचायत समितीतील ज्या नागरिकांना या आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा आहे. त्यांनी वरीलप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या सभेस उपस्थित रहावे. असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराकरिता अर्ज करावेत

          हिंगोली, दि. 27 :- शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी महिलांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तसेच स्वयंसेवी संस्थांना विभागस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2016-17 या वर्षासाठी प्रदान करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
            पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरीय पुरस्कार रु. 1 लाख 1 रुपये रोख, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, विभागस्तरीय पुरस्कार रु. 25 हजार 1 रुपये रोख, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, जिल्हास्तरीय पुरस्कार रु. 10 हजार 1 रुपये रोख, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात येतील. तसेच केंद्र शासनामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 10 ऑक्टोबर, 2016 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 07 हिंगोली येथे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. ए. कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  

***** 
जिल्ह्याया हंगामात 93.73 टक्के पावसाची नोंद

          हिंगोली, दि. 27 :- जिल्ह्यात मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 8.36 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  1.67  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 834.54 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात  पडलेल्या पावसाची टक्केवारी 93.73 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) औंढा नागनाथ - 110.40, हिंगोली - 100.80, वसमत - 89.23, कळमनुरी - 87.96, सेनगांव - 81.84 जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  93.73 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 2.86 (844.31), वसमत - निरंक (891.68), कळमनुरी - निरंक (826.47), औंढा नागनाथ - निरंक  (924.75), सेनगांव - 5.50 (685.49). आज  अखेर  पावसाची सरासरी 834.54 इतकी आहे.

***** 

26 September, 2016

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9.11 मि.मी. पावसाची नोंद

          हिंगोली, दि. 26 :- जिल्ह्यात सोमवार दिनांक 26 सप्टेंबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 45.57 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  9.11  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 832.87 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 93.54 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) औंढा नागनाथ - 110.40, हिंगोली - 100.46, वसमत - 89.23, कळमनुरी - 87.96, सेनगांव - 81.18 जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  93.54 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात सोमवार दिनांक 26 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 12.29 (841.45), वसमत - 15.86 (891.68), कळमनुरी - 8.00 (826.47), औंढा नागनाथ - 8.25  (924.75), सेनगांव - 1.17 (679.99). आज  अखेर  पावसाची सरासरी 832.87 इतकी आहे.

*****