01 September, 2016

 प्रशिक्षण योजनेसाठी विविध संस्थांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 1 :-  महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये चर्मकार समाजातील कुटूंबामधील पात्र मुला / मुलींसाठी प्रशिक्षण योजना ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी खालील अटी पूर्ण करीत असलेल्या संस्थांकडून प्रशिक्षण देण्याकरिता या जाहिरातीद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.  
संस्थेस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई -400001 , महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ , मुंबई -51 / व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ , मुंबई-51 यांच्याकडून मान्यता अथवा इतर तत्सम संस्थांशी संलग्नता असावी. सदर संस्था मागील सलग पाच वर्षापासून कार्यरत असावी. संस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. सदर संस्थेकडून मगील तीन वर्षाचे ऑडिट ट्रेडनिहाय प्रशिक्षणार्थींना वर्षनिहाय प्रशिक्षण दिलेले आहे, याचा तपशिल देण्यात यावा . सदर संस्थेमार्फत मागील तीन वर्षात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किती प्रशिक्षाणार्थींनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे / नोकरी मिळाली आहे. याचा तपशिल देण्यात यावा. सदर संस्थेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षार्थींपैकी 30 टक्के महिला प्रशिक्षणार्थी असणे आवश्यक आहे. सदर संस्थेस शासन मान्यतेप्रमाणे एका वर्षात ट्रेडनिहाय किती विद्यार्थांची प्रशिक्षणासाठी मान्यता असल्याबाबतचा सविस्तर तपशिल देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सदर ट्रेडची परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल याचा तपशिल देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉब प्लेसमेंटकरिता आपणांकडून काय कार्यवाही करण्यात येते व स्वंयरोजगार सुरु करण्यासाठी कोणती मदत प्रशिक्षार्थीस करण्यात येते . याकरिता आपणांकडे कोणती यंत्रणा कार्यरत आहे. याचा तपशिल देण्यात यावा. बाहेरगावच्या प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकेल काय ?  याबाबतचा तपशिल सादर करावा.
वरील अटींची पुर्तता करीत असलेल्या प्रशिक्षण संस्थांनी दिनांक 5 सप्टेंबर, 2016 ते 13 सप्टेंबर, 2016 या कालावधीमध्ये प्रस्ताव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय या ठिकाणी सादर करावा. तसेच प्राप्त झालेल्या संस्थेच्या प्रस्तावाची स्थळ पाहणी दिनांक 15 सप्टेंबर, 2016 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक करुन व त्याचा अहवाल प्रधान कार्यालय, मुंबई येथे सादर करतील, असे जिल्हा व्यवस्थापक हि. द. गतखणे (अ.का.) यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****  


No comments: