15 September, 2016

1951 कलम 33 अंतर्गत लायसन्स रद्द
हिंगोली दि. 15 :-  शासनाचे पत्र क्र. एमआयएस- 1215 /प्र.क्र-2/विशा-5, गृह विभाग, शिबिर कार्यालय, हैद्राबाद हाऊस, नागपूर दिनांक 22 डिसेंबर, 2015 मधील परिच्छेद क्र. 2 मध्ये नमूद केलेल्या खालील प्रमाणे 1 ते 4 विषयासंबंधीचे तयार केलेले सर्व नियम रद्द करण्याचे तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे. 1) Eating Houses Registration Certificate (खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र). 2) Swimming Pool License (स्विमिंग पुल लायसन्स). 3) Place of Public Entertainment License (PPEL-A). 4) Place of Public Entertainment Licence (PPEL-B) (लॉजिंग लायसन्स).
त्यानुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मधील तरतूदी नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून,अनिल भंडारी, जिल्हादंडाधिकारी, हिंगोली याव्दारे Hingoli District Eating Houses Licence and Place of Public Entertainment ((PPEL-B) (लॉजिंग लायसन्स) Rules 2001 या आदेशाव्दारे रद्द करीत आहे, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

*****

No comments: