14 September, 2016

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
हिंगोली दि. 14 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दिनांक 16 व 17 सप्टेंबर, 2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
शुक्रवार दि. 16 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता पुणे येथील निवासस्थानाहून शासकीय वाहनाने अहमदनगर-औरंगाबाद मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 17 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 08.40 वाजता हुतात्मा स्मारक हिंगोली येथे पुष्पचक्र अर्पण कार्यक्रम. सकाळी 09.00 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम. (स्थळ :- हुतात्मा स्मारक, देवडानगर, हिंगोली) दुपारी विविध शासकीय आढावा बैठका व कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री 10.30 वाजता अमरावती एक्सप्रेस रेल्वेने (गाडी नं. 11406) पुणेकडे प्रयाण.

***** 

No comments: