20 August, 2018

शासकीय कर्मचाऱ्यांची सर्वकष माहितीकोष 2018 अद्यावत करण्याचे आवाहन


शासकीय कर्मचाऱ्यांची सर्वकष माहितीकोष 2018 अद्यावत करण्याचे आवाहन

            हिंगोली,दि.20: राज्य्‍ा शासनाने शासनाच्या सेवेतील राज्य्‍ा शासकीय तसेच जिल्हा परिषदेत कार्यरत राज्य्‍ा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष अद्यावत करण्यात येत आहे. शासनाच्या नियोजन विभागाच्या दिनांक 04 जुन, 2018 च्या परिपत्रकान्वये कर्मचारी सर्वकष माहितीकोष 2018 अद्यावत करण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील राज्य्‍ा शासन, जिल्हा परिषद मधील सर्व राज्य्‍ा शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष अद्यावत करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.यामध्ये कार्यालयाची तसेच कर्मचाऱ्यांची माहिती https://mahasdb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संबंधीत सर्व कार्यालयांनी माहिती अद्यावत करावी.
सदरील माहिती दि. 1 जुलै, 2018 संदर्भ दिनांकास अनुसरून अद्यावत करावयाची आहे. सदर माहिती कोषामधील माहितीच्या सत्यतेबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखाची राहील. त्यामुळे माहितीकोषामध्ये ऑनलाईन माहिती सादर करते वेळेस काळजीपूर्वक माहिती सादर करणे आवश्य्‍ाक आहे. सदर संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जिल्हा सांख्यिकी कार्यालयामधून USER ID आणि PASSWORD उपलब्ध करून देण्यात येतील. त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयातील दि. 1 जुलै, 2018 संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांची माहीती अद्यावत करावी सदरील माहिती अद्यावत झाल्यानंतर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती सादर केल्याबाबतचे प्रथम प्रमाणपत्र सप्टेंबर 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रथम प्रमाणपत्र नोव्हेंबर,2018 अखेर प्राप्त्‍ा करून घ्यावे अन्यथा नोव्हेंबर 2018 (November 2018 Paid in December 2018) चे वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली जाणार नाहीत.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून आपण सादर केलेल्या माहितीची खात्री व त्रुटींचे निरसन केल्यानंतर दूसरे प्रमाणपत्र डिसेंबर 2018 ते फेब्रूवारी 2019 या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती बरोबर असल्याबाबतची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र फेब्रूवारी, 2019 अखेर प्राप्त्‍ा करून घ्यावे अन्यथा संबंधीत कार्यालयाचे फेब्रूवारी 2019 (February 2019 paid in March 2019) चे वेतन देयके पारित न करण्याचे शासनाचे आदेश आहेत याची गांभिर्याने नोंद घ्यावी. त्याअनुषंगाने सदर माहितीकोषामध्ये माहिती अद्यावत करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
*****

No comments: