01 October, 2016

अकृषिक वापर सहाय्यभूत समिती बैठक संपन्न  
         हिंगोली, 1 :- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 44 अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सुलभ करण्याकरिता उद्योजकास विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक प्रमाणित माहिती एक खिडकी सरंचनेतर्गत एकत्रितरित्या उपलब्ध होण्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभूत समितीची तसेच मेक इन इंडियाच्या शासन धोरणानुसार बैठक अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात नुकतीच संपन्न झाली.
अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यावेळी म्हणाले की, ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योगपतींनी त्यांच्या खाजगी जमिनीवर छोटे उद्योग उभे केली असतील तर त्याबाबत सर्व कागदपत्रे, नकाशासह, नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मैत्री कक्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे .
तसेच उद्योग उभारणीविषयी आयोजकांना इतर विभागाबाबत जसे महावितरण , सार्वजनिक बांधकाम विभाग, बँक, नगर रचना, नगर परिषद, उद्योग विभाग, एमआयडीसी विभाग, सहकार विभाग, वन विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाबाबत कांही अडचणी असल्यास अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा . सदर अडचणींना सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे श्री. गगराणी यावेळी म्हणाले.    

यावेळी बैठकीस नगर रचना सहाय्यक संचालक सु. ल. कमठाणे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, जिल्हा उपनिबंधक नरेंद्र निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डि. बी. निळकंठ, एमआयडीसीचे एरिया मॅनेजर एम. आर. महाडिक आदी विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थित होते.  

No comments: