25 October, 2016

 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न
हिंगोली, दि. 25 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रुग्ण कल्याण समिती जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांची बैठक जिल्हाधिकारी  श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी दत्तात्रय धनवे आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
मागील तीन महिन्यांतील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, कुंटूंब कल्याण तसेच मोतीबिंदु शस्त्रक्रियाबाबतची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांना माहिती दिली.
तसेच रुग्णालयात देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक व अद्ययावत सुविधा उपलब्धतेबाबत व वैद्यकीय सुविधा असल्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. सन 2016-2017 मध्ये रुग्ण कल्याण समितीस प्राप्त अनुदान व खर्च याबाबत मान्यतेस्तव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना सादर करण्यात आला. सन 2016-2017 मध्ये आर. के. एस.अतंर्गत प्राप्त अनुदान तसेच रुग्ण कल्याण समितीमधील पुढील खर्चाचे नियोजन व सदर नियाजनास मान्यतेस्तव सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे नियमित औषध निर्माता हे पद रिक्त असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे रुग्णालयात नियमित औषधनिर्माता हे पद भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर रुग्ण कल्याण समिती  , आखाडा बाळापूर मधील निधीमधून सदर पद भरण्याचीही परवानगी यावेळी देण्यात आली.
*****


No comments: