02 October, 2016

हिंगोली दसरा महोत्सव प्रदर्शनीचे  
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली :- 150 वर्षाची परंपरा लाभलेल्या हिंगोली दसरा महोत्सवातील प्रदर्शनीचे आज उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडावी, नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई सुर्यतळ, तहसीलदार श्री.अवधाने आदि उपस्थित होते.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य मासिकाच्या स्टॉलसह आदि स्टॉलला भेटी दिल्या.
तसेच हिंगोली वासियांनी दसरा महोत्सवात सहभागी होवून दसरा महोत्सवाचा आनंद घ्यावा, असेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आवाहन केले .

****  



No comments: