13 April, 2017

परभणी विभागांतर्गत
हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ग्रामीण डाक सेवक भरती
हिंगोली, दि. 13 : हिंगोली जिल्ह्यातील टपाल खात्यांतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी दि. 06 मे, 2017 पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन परभणी डाक विभागाचे डाक अधीक्षक यांनी केले आहे.
भरतीबाबतचे पात्रता निकष तसेच पदांबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline उपलब्ध असल्याचेही या निवेदनात म्हटलेले आहे.

***** 

No comments: