वृत्त क्र. 561                                               
बेटी बचाओ –बेटी पढाओ अभियानांतर्गतच्या  अमिषास बळी पडू नये
हिंगोली,दि.30: हिंगोली
शहरासह  ग्रामीण भागात  झेरॉक्स दुकानावर बेटी बचाओ बेटी पढाओ  या योजनेचा अर्ज एका विशिष्ट  नमुन्यात अर्ज भरल्यास  मुलीच्या पित्याला 3 लाख रुपये  अनुदान त्यांच्या  बँक खात्यावर जमा होणार आहे .  सदर अर्जासोबत 
संमती पत्र,  रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड
सर्टीफिकेटचे कागदही  जोडल्या जात आहेत. सदर
अर्जावर हिंदी भाषेत  मुलीचे नाव , अर्ज दाखल  करण्याचे नाव ,  गावाचे नाव , पत्ता , जन्म तारिख, शैक्षणिक योग्यता
, आधार नंबर , ई-मेल पत्ता, प्रवर्ग , बँक खात्याचा  नंबर , गावाचे 
नाव इत्यादी  माहिती घेतली जात आहे .
परंतू  सदर योजनेखाली अशा प्रकारची  कुठलेही अर्ज 
हिंगोली जिल्ह्याकरिता  जिल्हा परिषद
, हिंगोली या कार्यालयाकडून मागविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अशाप्रकारच्या  आफवांवर जनतेने  विश्वास ठेवू नये व अशाप्रकारचे कुठलेही अर्ज खरेदी  करुन भरण्यात येऊ नयेत.
यानंतर  कुठल्याही व्यक्तीने  अथवा  पुरवठा
धारकाने  अशा प्रकारचे अर्ज  विकण्याचा 
प्रयत्न  केला किंवा अर्ज भरुन  देण्यासाठी 
विनंती केल्यास  त्या व्यक्तीचे  अथवा पुरवठा 
धारकाचे नाव  महिला व बालकल्याण विभाग
, जिल्हा परिषद  , हिंगोली   या कार्यालयास  अवगत  करण्यात
यावेत .  त्याचप्रमाणे  बेटी बचाओ –बेटी पढाओ या योजनेखाली  कुठलीही माहितीची  आवश्यकता असल्यास  महिला व बालकल्याण  विभाग , जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयाशी  किंवा नजीकच्या  बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी  संपर्क साधावा . सदर  कार्यालयाशी संपर्क  केल्याशिवाय 
कुठल्याही  निवेदन अथवा  अमिषास बळी पडू नये,असे आवाहन उप मुख्य कार्यकारी
अधिकारी,   महिला व बालकल्याण विभाग , जिल्हा
परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
00000
 
No comments:
Post a Comment