04 March, 2017

महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे वेळेत सादर करावेत
                                   -- प्रकल्प अधिकारी विशाल राठोड
हिंगोली, दि. 4 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे सन 2016-17 चे भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा फ्रिशीपचे अर्ज दि. 10 मार्च, 2017 पर्यंत भरून घ्यावेत.
महाविद्यालयांनी ई-ट्रायबल संकेतस्थळावर ऑनलाईन फिस विवरण भरून प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे दि. 10 मार्च, 2017 पर्यंत सादर करून मंजुर करून घ्यावेत.
भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे सर्व परिपुर्ण प्रस्ताव छाननी करून दि. 15 मार्च, 2017 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे सादर करावे. दि. 15 मार्च, 2017 नंतर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास सर्व जबाबदारी महाविद्यालयाची राहील.
वरील कार्यवाही बाबत सर्व महाविद्यालयांनी सहकार्य करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ***** 

No comments: