29 March, 2017

ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराभिमुख मोफत प्रशिक्षण

हिंगोली, दि. 29 :- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यांच्या वार्षिक बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात, जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रशिक्षीत व्यवसायीक लोकांची कमतरता असल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगार तरुणाची व्यवसायिक प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायाला चालणा देण्याची गरज आहे. यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यांच्या सन 2017-18 या नवीन वर्षामध्ये स्थानिक सल्लागार समितीच्या बैठकीत युवक-युवतींना व्यवसायीक प्रशिक्षण देण्याचे ठरले आहे. त्यात महिला करिता, ड्रेस डिझायनिंग, बॅग मेकिंग, पेपर कव्हर, पीएमईजीपी व पुरुषांसाठी ईलेक्ट्रीक मोटर रिवायडींग आणि दुरूस्तीची कामे, टु व्हिलर मेकॅनिक आणि बचत गटासाठी दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, म्हैस पालन, पापड बनविणे, कुक्कुट पालन घेण्याचे ठरले आहे.
प्रशिक्षण केंद्रामार्फत ग्रामीण भागातील युवक-युवतींना संपुर्ण प्रशिक्षण/निवासाची/नास्टा, चहा, भोजन, विनामुल्य, त्याचबरोबर उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण बँक व्यवहार संबंधाचे मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास चालणा इत्यादी. प्रशिक्षाणार्थीने आपला प्रशिक्षण कार्यक्रम निवडतांना स्वत:ची आवड, शारिरीक क्षमता, आर्थिक कुवत, आजुबाजुला उपलब्ध साधणसामुग्री, उत्पादनासाठी बाजारपेठ व मागणी सातत्य याचा साकल्याने विचार करावा.
प्रशिक्षणार्थीची निवड ही मुलाखतीव्दारे घेण्यात येईल त्यात प्रशिक्षणार्थीने आपले अर्ज विहित नमुन्यात प्रशिक्षण केंद्राकडे पाठवु शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीची तारिख व प्रशिक्षणाची तारिख तुकडी क्षमतेनुसार कळविण्यात येईल निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी ना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन दिल्या जाणार नाही केवळ विनामुल्य प्रशिक्षण दिले जाईल.
अर्जासाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमा करावे. अर्ज निशुल्क उपलब्ध आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची प्रशिक्षणार्थीने नोंद घ्यावी, असे आवाहन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: