20 March, 2017

ग्राहकामध्ये त्यांच्या हक्काबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मेगा कॅम्प शिबीराचे आयोजन
        हिंगोली, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहकामध्ये त्यांच्या हक्का बाबत जागृती निर्माण करण्यासाठी मेगा कँम्प (भव्य शिबीराचे) आयोजन दि. 23 मार्च, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता केले आहे. सदर शिबीरामध्ये भारती ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई चे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सदर कँम्प मध्ये हजर राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राहक सरंक्षण परिषदेचे सदस्य, सर्व शासकीय विभागाचे प्रमुख व जनतेस उपस्थित राहण्याचे आवाहन मा.जिल्हाधिकारी हिंगोली यांचे वतीने करण्यात येत आहे.
या शिबीरामध्ये ग्राहकांचे हक्क या विषयावर व्याख्यान तसेच कोणतीही वस्तु/सेवा घेतांना घ्यावयाची काळजी, तक्रार कोठे व कशी करावी, ग्राहक न्यायालय, शैक्षणिक व अर्थीक नियोजन, विमा, बँक, प्रवासाची साधने वा मालमत्ता, दुरसंचार सेवा, विद्युत उपकरणे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या फसवणूकीमध्ये दाद कोठे मागावी. या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेमध्ये सदर कार्यशाळेमध्ये आपल्या जवळील बचतीचे लवकरात लवकर गुंतवणूकीचे व्यवस्थापन कसे करावे यावर योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. उदा. वित्तीय संकल्पना आणि धोरण, वित्तीय उत्पादने, म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधील फरक, चांगली योजना कशी निवडावी, अर्थीक अफवावर विश्वास ठेवू नये. आयुर्विमा किंवा वैद्यकिय विमा कसा घ्यावा. इत्यादी या कार्यक्रमा बरोबर ग्राहकोपयोगी एक लघुपट दाखवला जातो. ज्या मध्ये ग्राहकासाठी असणारी बहूमोल माहिती आहे. आधि ग्राहक मार्गदर्शन व्याख्यान दिले जाते. त्याच बरोबर एका बाजूला दुध परीक्षण केले जाते. या कार्यशाळेसाठी लागणारी दूध परीक्षण यंत्र आणि त्याचे परिक्षण करुन सदर अहवाल दूध आणणाऱ्या व्यक्तीस 40 सेकंदात दिला जातो, त्याची एक प्रत आम्ही आमच्यापाशी राखून ठेवतो. दूध परीक्षण यंत्र चालविण्यासाठी आमचे प्रशिक्षित तज्ज्ञ आमच्या बरोबर असतात. शिबीरात येणाऱ्या सर्व तक्रारीची छाननी करुन तक्रारदारास त्या त्या तज्ज्ञ सभासदांकडे पाठविली जाते. सभासद तक्रार संपूर्णपणे ऐकून घेतात व त्याची नोंद आम्ही तयार केलेल्या एका फॉर्मवर लिहून घेतात. तक्रारदाराने आणलेल्या तक्रारींचे दोन संच आम्ही आमच्याकडे ठेवून घेतो. त्या अनुषंगाने सदर तक्रार त्या त्या विभागात स्पीड पोष्टाने पाठविल्या जावून त्यांचा पाठपूरावा देखील केला जातो.
या शिबीरात शेतीसाठी शासनाने पूरविलेले सोलर आणि पंप न मिळणे, घराच्या बांधकामाचे योग्य पैसे भरुन सुध्दा बांधकाम व्यावसायिक ताबा देण्यास टाळाटाळ करतो, बँकेच्या कर्जाचे हप्ते भरुनसुध्दा पुन्हा पुन्हा बँकेचे पत्रक मिळणे, वैद्यकीय विम्याचे पैसे न मिळणे किंवा त्यामध्ये कपात करणे, नवीन घेतलेल्या दागिन्यांमध्ये नमूद केलेली शुध्दता नसणे, वीज वापराचे मिटर योग्यप्रकारे न चालणे, तक्रार करुनसुध्दा त्याची दखल न घेणे, मोबाईल, कॉम्पुटर, घरगुती तीज उपकरणे हमी दिलेल्या कालावधीत बिघडणे, परंतू त्याची दखल उपरकण बनविणारी कंपनी घेत नाही. छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत वस्तू विकणे या तक्रारीचा देखील निपटारा करण्यात येणार आहे.

*****

No comments: