10 March, 2017

नेहरू युवा केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि
हिंगोली तालुकास्तरीय पडोस युवा सांसद कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि. 10 : युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांच्या वतीने रिसाला बाजार, हिंगोली येथे दि. 8 मार्च, 2017 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय पडोस युवा सांसद जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाहेजहाँ पठाण, दिपाली काळे, विशाल सारडा, पठाण यास्मीन बेगम, लता सोनवणे आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमात चंदा रावळकर यांनी उपस्थितांना रोजच्या जीवनातील कॅशलेस व्यवहाराचे महत्व पटवून देण्यात आले तसेच कॅशलेस व्यवहार कशाप्रकारे करतात याबाबतची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. यानिमित्ताने ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहार करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात हिंगोली तालुक्यातील युवक मंडळ, महिला मंडळ आणि स्वयंसेवी व सेवाभावी संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहरु युवा केंद्राच्या वतीने नामदेव सपाटे, भगवान चंद्रवंशी, सुमय्या पठाण, नामदेव वाबळे, आदिंनी परिश्रम घेतले.

*****

No comments: