14 June, 2018

आयटीआय प्रवेश प्रकिया सुरु

आयटीआय प्रवेश प्रकिया सुरु
         हिंगोली, दि. 14:- शैक्षणिक वर्षे 2018-19 साठी  औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे एकूण  सात ट्रेडसाठी  प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 जून 2018 पासून सुरु झालेली आहे.आयटीआय हिंगोली येथे प्रवेशासाठी एकूण 230 जागा असून त्यासाठी  ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया 1 जून ते 20 जून 2018 पर्यंत असून इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी . नोंदणी  केल्यानंतर  अर्ज निश्चिती  ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करणे आवश्यक आहे.अर्ज निश्चित केल्यानंतर उमेदवारांनी आपल्या पसंती क्रमानुसार ट्रेड व आयटीआय चा पसंती क्रम देणे आवश्यक आहे. त्यानंतरच  पुढील प्रवेश फेरीसाठी  संबंधितांचा  विचार करण्यात येईल. प्रवेशासाठी  लागणाऱ्या मूळ कागदपत्राची यादी आयटीआय मध्ये  लावलेली आहे.
अल्पसंख्यांक घटकासाठी  विशेष ट्रेड
            अल्पसंख्यांक घटकातील जसे की, मुस्लिम,बौध्द,ख्रिश्चन, शीख , पारशी  व जैन  घटकातील महिलांसाठी बेसिक कॉस्मेटोलॉजी (पूर्वीचे नाव ब्युटी पार्लर) हा ट्रेड उपलब्ध  असून संबंधितांनी  याचा फायदा  घ्यावा असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सं.प्र. भगत यांनी केले आहे.
00000




No comments: