07 June, 2018

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जूनपर्यंत प्रवेश सुरु


अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जूनपर्यंत प्रवेश सुरु

        हिंगोली, दि.7: अपंग कल्याण आयुक्तालय म. रा. पुणे मार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मार्फत शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी  18 ते 40 वयोगटातील  अपंग व मुकबधीर  मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (हार्डवेअर व कॉम्प्युटराइज्ड अकाँटींग अँड ऑफीस ॲटोमेशन) वेल्डर कम फॅब्रीकेटर, कंपोजिंग प्रिंटींग अँउ बायडींग, शिवन कर्तन कला, टंकलेखन, वीजतंत्री इत्यादी अभ्यासक्रमासाठी  प्रवेश देण्यात येत आहे . संस्थेत अपंग आणि मुकबधीर  प्रशिक्षणार्थ्यांना  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत  पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे . प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय  औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे .
            तरी इच्छूक अपंग मुला-मुलींनी पालकांनी दिनांक 30 जून, 2018 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशक्षिण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर, जि. नांदेड मो. क्र. 9403207100, 9960900369, 7385207093, 9503078767 येथे संपर्क साधावा.
0000

No comments: