16 October, 2020

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते बाल संरक्षण माहिती पुस्तिकेचे विमोचन


हिंगोली,
 दि. 16 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘‘बाल संरक्षण माहिती पुस्तिका’’ तयार करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे विमोचन आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, विधी सल्लागार विद्या नागशेट्टीवार, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी, परिविक्षा अधिकारी सुनिता पुजलवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखॉन पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड . अनुराधा पंडित आदी उपस्थित होते.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेत जिल्ह्यातील बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणा, बालकांसाठीच्या योजना व कायदे, अधिकार याबाबतची माहिती  देण्यात आली आहे.

*****

No comments: