08 July, 2021

 

बीजभांडवल व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी

जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) , दि. 8 :  येथील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत बीजभांडवल कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतून सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी विविध व्यवसायासाठी बँकांकडे कर्ज प्रस्ताव शिफारस करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना विविध व्यवसायासाठी बीजभांडवल योजनेअंतर्गत 25  लाख रुपयांपर्यंतची कर्ज प्रकरणे बँकांना शिफारस करण्यात येतील. त्यामध्ये 75 टक्के बँक कर्ज, 10 टक्के लाभार्थी हिस्सा व 15 टक्के जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीजभांडवल रुपाने कर्ज देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्र  कर्ज योजनेअंतर्गत ग्रामीण भागात उत्पादन व सेवा उद्योगासाठी 2 लाख रुपयांपर्यंत  कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये 75 टक्के बँक कर्ज, 5/10 टक्के लाभार्थी हिस्सा व 15/20 टक्के जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मार्जीन मनी रुपाने कर्ज असे स्वरुप असेल.

वरील दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला, सर्वसाधारण  व इतर प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी स्वयंरोजगारासाठी व्यवसाय करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: