23 July, 2021

 


जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

****

No comments: