13 July, 2021

 

पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम

गरजूंनी  लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली, (जिमाका) दि. 13 : राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत आहे. यासाठी शासनाने कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असिस्टंट योगा इन्स्ट्रक्टर (पात्रता 8 वी पास), हेल्थ केअर क्वालिटी ॲस्यूअरन्स मॅनेजर मेडिकल ग्रॅज्यूएट (पात्रता : एमबीबीएस/बीएचएमएस/बीएएमएस/बीयुएमएस तीन वर्षाच्या अनुभवासह), एल्डरली केअरटेकर (पात्रता : 5 वी पास) तसेच हिंगोली उर्मिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जनरल ड्यूटी असिस्टंट ॲडव्हान्स (पात्रता : 10 वी पास), वसमत येथील सातपुते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनरल ड्यूटी असिस्टंट ॲडव्हान्स (पात्रता : 10 वी पास) तसेच वसमत येथील शिवम हॉस्पिटल आयसीयु येथे पंचकर्म टेक्नीशियन (पात्रता : 12 वी पास) हे कोर्स उपलब्ध आहेत.

            गरजू उमेदवार किंवा ज्याना वैद्यकीय ज्ञान घ्यावयाचे आहे व त्याद्वारे रोजगार मिळवायचा आहे किंवा वैद्यकीय ज्ञानाशी संबंधित उमेदवारासाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम निशुल्क असून प्रशिक्षणांती उमेदवारास प्रमाणपत्र व रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. इच्छूक व पात्र उमेदवारांनी  https://forms.gle/LXG93k9yYiQYZa6t5 या लिंकचा वापर करुन गुगल फॉर्ममध्ये माहिती भरुन लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे .

****

No comments: