08 September, 2017

ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा
सार्वत्रिक निवडणूकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर
        हिंगोली, दि. 07 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील माहे ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकरिता मतदान दिनांक 26 सप्टेंबर, 2017 रोजी तर दि. 27 सप्टेंबर, 2017 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी हिंगोली यांनी दिली आहे.
            ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 1) तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा गुरूवार, दिनांक 24 ऑगस्ट, 2017, 2) नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. 4 सप्टेंबर, 2017 (सोमवार) ते दि. 11 सप्टेंबर, 2017 (सोमवार)  सकाळी 11.00 वा. पासून ते दुपारी 5.30 पर्यंत (दि. 9 व 10 सप्टेंबर, 2017 रोजी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून), 3) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) मंगळवार, दि. 12 सप्टेंबर, 2017 सकाळी 11.00 वाजेपासून छाननी संपेपर्यंत, 4) नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) गुरूवार, दि. 14 सप्टेंबर, 2017 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, 5) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ गुरूवार, दि. 14 सप्टेंबर, 2017 दुपारी 3.00 वा. नंतर, 6) आवश्यक असल्यास मतदानाचा मंगळवार, दिनांक 26 सप्टेंबर, 2017 सकाळी 7.30 वा. पासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत (गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत), 7) मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.) बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2017, 8) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूकांचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2017.
                                                                                     

*****

No comments: