07 September, 2017

महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियनबाबत क्रीडा शिक्षकांची बैठकीचे आयोजन

हिंगोली, दि. 7 :  जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्डकप स्पर्धा दि. 06 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रिम प्रोजक्ट पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी जाहिर केला आहे. राज्यातील व हिंगोली जिल्ह्यातील मुला-मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व शाळा / संस्थांनी या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी झालेले आहेत. या पुढील नियोजनासाठी दि. 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या शाळांची व शाळेतील खेळाडूंची किमान 50 व कमाल 100 नावे एक्सेल शिटमध्ये (Excel Sheet) भरुन dsohingoli01@gmail.com या ई-मेलवर दि. 12 सप्टेंबर 2017 पर्यंत पाठविण्यात यावी.
शाळेचे नांव, शाळेचा पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, शाळेतील एकुण विद्यार्थी संख्या मुले व मुली याबाबत दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी प्रत्यक्ष फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची संख्या मुले व मुली नोंदणी अर्जाचा नमुना :- मुलांची व मुलींची यादी किमान 50 कमाल 100
अ.क्र
खेळाडूंची नावे
वर्ग व इयत्ता
वय
जन्म तारीख
आधार क्रमांक






             
आपल्या शाळेत दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी प्रत्यक्ष फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंना फुटबॉल खेळविण्यात यावेत व जे मुले-मुली फुटबॉल खेळणार नाहीत अशा मुला-मुलींच्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, शुभेच्छापत्र इत्यादी उपक्रम राबविण्यात यावा व सदर कार्यक्रमाचा अहवाल 3 फोटोसह, पेपर कात्रणासह दि. 17 सप्टेंबर 2017 पर्यंत संकलित माहिती dsohingoli01@gmail.com वर तसेच dydabadfootball@gmail.com या ई-मेलवर  दि. 17 सप्टेंबर 2017 पर्यंत पाठविण्याबाबत सर्व संबंधित शाळांना कळविण्यात यावे.
या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली व शिक्षणाधिकारी (प्रा.मा), हिंगोली  यांच्या अध्यक्षतेखाली दि. 07 सप्टेंबर, 2017 रोजी दुपारी 2.00 वा. जिल्हा परिषद कन्या प्रशाला, हिंगोली येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.  या बैठकीस आपल्या तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना उपरोक्त माहितीसह उपस्थित राहण्याच्या बाबतीत सुचना देण्यात याव्यात, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविले आहे.

*****

No comments: