07 March, 2018

पारधी विकास योजने अंतर्गत ॲप ॲटो योजनेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ



पारधी विकास योजने अंतर्गत ॲप ॲटो योजनेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ

हिंगोली,दि.07: पारधी विकास  योजना सन 2016-17 हिंगोली जिल्ह्या अंतर्गत पारधी जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार  युवक/युवतींना मालवाहू ॲपे ॲटो पुरवठा करणे या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज दिनांक 29 /12/2017 पर्यंत  मागविण्यात आले होते . परंतू विहित कालावधीमध्ये  पात्र  लाभार्थ्यांचे अर्ज पुरेशा  प्रमाणात  प्राप्त  न झाल्यामुळे व प्राप्त अर्जांची पडताळणी  केली असता बऱ्याच अर्जांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. सबब यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी  नव्याने अर्ज न करता त्रुटीच्या कागदपत्रांची पूर्तता करावी व नवीन इच्छूक लाभार्थ्यांनाही अर्ज सादर करण्यास दि. 15 मार्च, 2018 पर्यंत मुदतवाढ  देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, कळमनुरी, हिंगोली यांचे नावे येाजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण  कागदापत्रांसह आवेदन अर्ज विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना मालवाहू ॲपे ॲटो  पुरवठा करणे (हिंगोली जिल्ह्याकरिता) विहित मुदतीनंतर आलेले व अपूर्ण  असलेले आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, कळमनुरी, हिंगोली यांनी  कळविले आहे.
00000



मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.07: 65 वी  वाहिनी  स.सी. बल, येल्की  येथील  कर्मचाऱ्यांचा  गोळीबार सराव घ्यावयाचा असल्याने मौजे वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  सर्वे नं. 25 व 29  मध्ये  गोळीबार सराव  मैदान उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे. त्यानूसार महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33(1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात  दिनांक 7 मार्च ते 10 मार्च  पर्यंत गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे . 
सदर दिनांकास खालील अटीवर  गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000

No comments: