13 March, 2018

लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ



  लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
            हिंगोली,दि.13: गाय व म्हैस  वर्गीय  जनावरांमध्ये  होणाऱ्या  लाळ खुरकुत रोगामुळे जनावराची  उत्पादकता  व कार्यक्षमता  कमी होऊन  मोठ्या प्रमाणात  पशुपालकांचे  आर्थिक  नुकसान होऊ  शकते. सदरील  रोगाचा प्रादुर्भाव  नियंत्रणात ठेवण्याकरिता  पशुसंवर्धन विभागामार्फत  वार्षिक दोन फेरीमध्ये  संपूर्ण  राज्यात  लाळ खुरकुत  रोग प्रतिबंधक  लसीकरण  करण्यात येते . या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यास  एकूण 3 लाख 42 हजार 300 लस मात्रा प्राप्त झालेल्या  असून जिल्ह्यातील  संपूर्ण  100 टक्के  गाय व म्हैस  वर्गीय जनावरांमध्ये  लसीकरण करण्यात येणार आहे . सदरील  लसमात्रा जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय  दवाखान्यास  पुरवठा करण्यात आलेल्या  असून जिल्ह्यात  मोहीम स्वरुपात  लसीकरण  राबविण्यात  येणार आहे .  ही मोहीम ही 21 दिवसांत पूर्ण करावयाची असून दिनांक 14 मार्च पासून प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ  करण्यात येणार आहे .  या मोहिमेदरम्यान  जिल्ह्यातील  सर्व पशुपालकांनी  लाळ खुरकुत रोगापासून  आपलया जनावरांचा  बचाव  करण्याकरिता  संबंधित  पशुवैद्यकीय  दवाखान्यात  संपर्क  साधून आपापल्या  जनावरांस लाळ खुरकुत  रोग प्रतिबंधक लसीकरण  करवून घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments: