09 February, 2018

जिल्ह्यात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन



वृत्त क्र.50                                                                            दिनांक : 9 फेब्रुवारी 2018
जिल्ह्यात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन
        हिंगोली दि.09: 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना  शाळा व अंगणवाडी  केंद्र  स्तरावर जंतनाशक  गोळी देऊन त्यांचे आरोग्य  चांगले ठेवणे पोषण  स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात येते . याचे औचित्य साधून जिल्ह्यात  दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक मोहीम  आरोग्य  विभाग , महिला व बाल कल्याण विभाग व  शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे .  या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 3 लाख 61 हजार 148 मुला- मुलींना  जंतनाशक  गोळी देण्यात येणार आहे . जंतनाशकाची गोळी  सर्व  शासकीय अनुदानित , खाजगी शाळांमध्ये आणि अंगणवाडी  केंद्रामध्ये नि:शुल्क  मिळेल. या मोहिमेचे  उद्घाटन  मान्यवरांच्या हस्ते  जिल्हा परिषद कन्याशाळा येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.
00000

No comments: