29 November, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 59 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 659 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 395 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 आझादी का अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील विविध ठिकाणी

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहितीचे पत्रक व पुस्तिका वितरण करुन जनजागृती

 

        हिंगोली, दि.29 (जिमाका) :  जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व   आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आज हिंगोली शहरातील गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व शहरातील विविध ठिकाणी जाऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली. तसेच बाल कायद्यांची माहिती देवून जनजागृती करण्यात आली.

            नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.nic.in या संकेत स्थळावर कायदेशीर प्रक्रिया व नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो. याविषयी व बालविवाह प्रतिबंध कायदा-2006, बाल संगोपन योजनेविषयीची माहिती  कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी दिली.

यावेळी  सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, बाह्य क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांची उपस्थिती होती.

*****


 

 


आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त

महिला व बालविकास विभागाच्या वतीने हिंगोली येथे जनजागृती

 

        हिंगोली, दि.29 (जिमाका) :  जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना   आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने दि. 26 नोव्हेंबर, 2021 रोजी हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली. तसेच बाल कायद्यांची माहिती देवून जनजागृती करण्यात आली.

            नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.nic.in या संकेत स्थळावर कायदेशीर प्रक्रिया व नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो. याविषयी व बालविवाह प्रतिबंध कायदा-2006, बाल संगोपन योजनेविषयीची माहिती  कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी दिली.

यावेळी विधी सल्लागार ॲड . विद्या नागशेट्टीवार, उर्मिला तांबे, शितल भंडारे, अनिरुध्द घनसावंत यांची उपस्थिती होती.

*****

26 November, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 03 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 03 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 57 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 659 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 03 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 395 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 

जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने 26 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत

हुंडाबंदी सप्ताह साजरा करावा

 

           हिंगोली (जिमाका), दि. 26 : - शासनाने 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन व या दिवसापासून पुढील सात दिवस हुंडाबंदी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिवस म्हणून तसेच या दिवसापासून पुढील सात दिवस हुंडाबंदी सप्ताह साजरा करणे आवश्यक आहे.

            जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2021 या कालावधीत हुंडाबंदी सप्ताह साजरा करावा. तसेच या हुंडाबंदी सप्ताहानिमित्त प्रत्येक कार्यालयात हुंडाबंदी दिनाची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

****

 


औंढा नागनाथ येथे तालुकास्तरीय भाषण स्पेर्धेचे आयोजन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 26 : येथील नेहरु युवा केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ येथील नागनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तालुकास्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. व्ही.एन.व्यवहारे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. नंदकिशोर हे होते. यावेळी परीक्षक डॉ. एस. एन. नाईकवाडे, डॉ. एस.डी. शेळके, डॉ.डी.एम. कुंचलेवाड, डॉ. बी.आर. कुंडगीर, डॅ. एन. बी. पोहकर, साठे, डांगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक श्रीकृष्णा पखवाणे व अनिल बिंगे यांनी केले.

            या स्पर्धेत औंढा तालुक्यातील 9 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये अस्मिता देविदास मुळे प्रथम, स्वाती नामदेव भारशंकर द्वितीय तर शेख सहनाज शेख शकील यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या तिन्ही विद्यार्थीनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

*****

 





जिल्हा ग्रंथालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन

 

           हिंगोली (जिमाका), दि. 26 : - आजादी का अमृत महोत्सवानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी भारतीय संविधान दिनानिमित्त महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

          या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, नूतन साहित्य मंदिर वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रा. जी. पी. मुपकलवार, ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह संतोष ससे, मिलींद थंबल, कुंडलीकराव सरकटे, गजानन सावके, कुलदीप मास्ट, पंडित अवचार, मिलींद सोनकांबळे, रामभाऊ पुनसे  व ग्रंथालय पदाधिकारी, विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. यावेळी  मान्यवरांचा ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.

****