19 May, 2017

जिल्ह्यातील 35 गावासाठी नवीन विंधन विहिरीच्या प्रस्तावास मान्यता
हिंगोली, दि. 19 : पाणी टंचाई अंतर्गत हिंगोली तालूक्यासाठी 23 तर कळमनूरी तालूक्यासाठी 12 अशा एकूण  35 गावाकरीता नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील 1) भिंगी 2) देवठाणा 3) कानडखेडा खु. 4) पिंपळदरी त. बासंबा 5) सावरगाव बंगला 6) कलगांव 7) नवलगव्हाण 8) जामठी खु. 9) चोरजवळा 10) हिरडी 11) कोथळज 12) लिंबी 13) लोहरा 14) जोडतळा 15) टाकळी त. नांदापूर 16) तिखाडी 17) समगा 18) राजुरा 19) पेडगांव 20) सायाळा 21) ईडोळी 22) येळी आणि 23) सावा कळमनुरी तालुक्यातील 1) असोलवाडी 2) जटाळवाडी 3) कोंढूर 4) सोडेगाव 5) बोथी 6) असोला 7) रेडगाव 8) फुटाना 9) उमरदरावाडी 10) मोरवड 11) कळमकोंडा खु. आणि 12) गांगापूर  अशा एकुण 35 गावांसाठी 35 नवीन विंधन विहिरी व हातपंपाचे कामाचे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रत्येकी 49 हजार 605 याप्रमाणे 17 लाख 36 हजार 175 रुपये निधीच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता प्रदान केली आहे. सदरील 35 गावांमध्ये जर यापुर्वी विंधन विहीरी घेण्यात आल्या असतील तर प्रामुख्याने त्याची दुरूस्ती शक्य असेल तर दुरूस्त करावे या अटीस अधिन राहून या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत.

*****  
‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’
21 मे ऐवजी 20 मे रोजी होणार साजरा

हिंगोली, दि. 19 : ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ रविवार दि. 21 मे 2017 रोजी साजरा करण्यात येतो. परंतू रविवार दि. 21 मे 2017 रोजी राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सार्वजनीक सुट्टी असल्यामुळे शनिवार दि. 20 मे 2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ साजरा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकान्वये दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी याबाबत दि. 16 मे, 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये योग्य ती कार्यवाही करावी व शनिवार दि. 20 मे, 2017 रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ साजरा करावा, असे जिल्हाधिकारी हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

***** 

18 May, 2017

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 17 :  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 14 मे, 2017 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 28 मे, 2017 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
आगामी काळात धरणे, मोर्चे, रस्तारोको, आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 14 मे 2017 ते दि. 28 मे 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

                                                            *****   
बेळगाव येथे सैनिकांच्या पाल्यांकरिता युनिट कोटा सैन्य भरती
हिंगोली, दि. 17 : जिल्ह्यातील आजी / माजी सैनिक व विधवांसाठी दि. 12 जून, 2017 ते दि. 15 जून, 2017 पर्यंत मराठा लाईट रेजीमेंटल सेंटर बेळगाव कँम्प येथे आजी /  माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांसाठी सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदरील सैन्य भरतीमध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर ट्रेडसमॅन व सोल्जर कार्ल्ककरिता दि. 12 जून, 2017 पासुन भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी सकाळी 6 वाजण्यापूर्वी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
जनतेच्या तक्रारीस प्राधान्य देवून तात्काळ सोडवाव्यात
                                                                   --- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

        हिंगोली, दि.17: दैनंदिन जीवनातील वीज अत्यंत महत्वाचा घटक असून, वीजेशिवाय कोणताचा विकास होऊ शकत नाही. महावितरण कंपनीवर सुरळीत वीज पुरवठा करण्याची अतिमहत्वाची जबाबदारी असून, अधिकारी-कर्मचारी यांनी जनतेचे तक्रारीस प्राधान्य देवून तात्काळ सोडविण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील महावितरण व महापारेषणच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी बैठकीस आमदार तान्हाजी मुटकुळे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी नगराध्यक्ष श्री. शिंदे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
            ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना शाश्वत वीज देण्याची शासनाची भूमिका असून राज्यात शेतकऱ्यांना सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरु करण्यात येणार आहे. विविध उपयोजनेसाठी  हिंगोली जिल्ह्यासाठी 198 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच महापारेषण अंतर्गत बाराशिव, आखाडा बाळापूर आणि कुरुंदा  175 कोटी खर्च  करुन जिल्ह्यात 132 के.व्ही. मोठे वीज केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात कृषी वाहिनीवरील 11 फिडर सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन असुन, यामुळे शेतकऱ्यांना दिवसातून 12 तास वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारी जमिनी किंवा शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाड्याने घेण्यात येणार आहे.
राज्यात मागील वर्षात 3 लाख 10 हजार वीज जोडण्या देण्यात आल्या असून, प्रलंबित कृषी वीज पंप वीज जोडण्यांचा अनुशेष देखील लवकरच दूर करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला स्वतंत्र लाईनमन पाहिजे असल्यास गावातीलच इलेक्ट्रिक विषयातून आयटीआय, तंत्रनिकेतन प्रशिक्षण पुर्ण घेतलेल्या उमेदवारास वीज व्यवस्थापक म्हणून घेता येणार आहे. महावितरणने आणलेल्या मोबाईल अँपचे केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी कौतुक केले आहे. ग्राहकांनी सुद्धा याचा वापर केल्यास गतिमान सेवा मिळण्यास मदत होणार आहे. नगरपंचायती व ग्रामपंचायतीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या नळयोजना आणणार असून हे सर्व प्रकल्प जनतेच्या सहकार्याने पूर्णत्वास जातील असा विश्वास ऊर्जामंत्री यांनी व्यक्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतांना बावनकुळे म्हणाले की, अवैध दारु विक्री विरोधात मोठी लढाई सुरु करण्यात येणार आहे. अवैध दारु दुकानाबाबत तक्रार प्राप्त होताच 12 तासात त्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
            यावेळी बैठकीस महावितरण, महापारेषण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

**** 

17 May, 2017

ट्रान्सफॉर्मर-वीज खांबांची ने-आण शेतकरी करणार नाही :
र्जामंत्री हिंगोलीत नागरीकांशी थेट संवाद, ऑन स्पॉट तक्रारींचा निपटारा  
तक्रारकर्तांच्या चेह-यावर समाधान
हिंगोली, दि. १७:‍- ऊर्जा मंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रशासनाने घेतली धडकी, तर जनतेत आनंद अशी स्थिती येथे पहायला मिळाली.एका शेतकऱ्याने म्हटले की,मंत्री गावातून गेले की अधिकारी सुटकेचा श्वास घेतात व पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागतात. आता बोलतात ते करून दाखवत नाहीत. याउलट एक शेतकरी म्हणत होता की अधिकाऱ्याकडून आम्हाला त्रास होईल ते आमचे काम करणार नाही अशी भितीही दिसून येत होतीट्रान्सफॉमर आणि विजेचे खांब ने-आण करण्याचे काम शेतकऱ्यांचे नाही. त्यासाठी शासनाने निधी दिला असून शेतकऱ्यांनी डीपींची आणि खांबांची ने-आण करू नये तसेच महावितरणला अभियंत्यांनी यासाठी वेठीस धरू नये असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.
हिंगोली येथे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आयोजीत नागरिकांनी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार रामराव वडकुते व त्याचबरोबर महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर “ऑन स्पॉट” निकाल ऊर्जामंत्री यांनी दिला. प्रथमच हिंगोलीत असा उपक्रम राबविण्यात आल्याने भर कडक उन्हातही नागरिकांणी गर्दी केली होती. कंत्राटदार शेतकऱ्याला कामे सांगतांत, अभियंते, फोन उचलत नाही, वीज कनेक्शन मिळत नाही, ट्रान्सफॉर्मर मिळत नाही अशा साध्या तक्रारी यावेळी आल्या.
नागरिकांच्या तक्रारीवर ऊर्जामंत्र्यांनी संबंधित विभागाला कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व कार्यकारी अभियंत्याकडून खुलासा मागवला, हिंगोली स्तरावरील तक्रारी आठवडाभरात व मोठया तक्रारी १५ दिवस ते महिन्याभरात सोडविण्याचे निर्देश दिले.
तीन हजार लोकसंखेपेक्षा अधिक लोकसंख्याच्या ग्रामपंचायतींची कनिष्ठ अभियंत्यांनी संपर्क करुन ग्राम विद्युत व्यवस्‍थापकाचे पद भरण्याचे कारवाई करण्याचे निर्देश दिले. गेल्या अनेक दिवसांनपासुन डीपीची ने-आण शेतकरीच करतात या कामासाठी जे शेतकरी पैसे देतात त्यांच्याकडे डीपी लवकर लावली जाते अशा तक्रारी शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केले.  या तक्रारीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या संतप्त भावना बघायला मिळाल्या.
या थेट संवाद कार्यक्रमात १३६ तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारी सुटन्यासारख्या आहेत. त्या दृष्टीने कामे पुर्ण करुन व्हॉट्सअप वर पाठवुन द्याव्यात व त्याच बरोबर ३१ जुलै पर्यंत सुटल्या नाहीत तर कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता यांना जबाबदार धरण्यात येईल. पुढच्या दौऱ्यापर्यंत कामे पुर्ण न केल्यास माफी मिळणार नाही. आलेल्या तक्रारारीच्या अनुषंगाने दक्षता समितीतर्फे चौकशी करण्यात यावी असे निर्देशही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

****
शेतकऱ्याला शाश्‌वत वीज देणार : ऊर्जामंत्री बावनकुळे
३३ केव्हीच्या दहा उपकेंद्राचे हिंगोलीत भूमीपूजन
हिंगोली दि.17:‍ शेतकऱ्याची प्रगती आणि आर्थिक उन्नती वीज असेल तरच होईल. यासाठीच हिंगोली जिल्हयाला आतापर्यंत २९८ कोटी दिले व आणखीन १७५ कोटी देवून मोठी कामे करण्यात येतील. एकूण ४७५ कोटी रूपयांची विजेची कामे या जिल्हयात करून शेतकऱ्याला व ग्राहकांना शाश्वत वीज देणार असे आश्वासन  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.
   हिंगोली जिल्हाअंतर्गत 33 के.व्ही.च्या 10 उपकेंद‍्रांचे भूमिपूजन प्रसंगीत बोलत होते. याप्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता आविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता बाबसाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना ऊर्जामंत्री  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनुष्याच्या शरीरातीन रक्तवाहिनीइतके महत्व विजेला आहे.एक दिवस वीज बंद झाली तर तीन दिवसांचे नुकसान होते. सरकार बदलले आहे . आता शेतक-याला कबुल केली तेवढी वीज देण्यास सरकार बांधिल आहे. नविन 10 उपकेंदांमुळे परिस्थितीत आणखी सुधारणा होणार आहे. हिंगोली तालूक्यातील खाकीबाबा मठ,समगा, कळमनुरी तालूक्यातील लमानदेव, मसोड तसेच सेनगाव तालूक्यातील जयपूर, जवळा बु., औंढा नागनाथ येथील रूपूर तांडा तर वसमत तालूक्यातील सेलू,पाडी खुर्द आणि पळशी या ठिकाणच्या उपकेंद्रामुळे हजारो वीजग्राहकांना अखंडीत आणि योग्यदाबाचा वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे असेही ऊर्जामंत्र्यानी स्पष्ट केले.
महावितरणच्या कर्मचारी/अभियंत्यांनी ग्राहकांच्या तक्रारी येणार नाही असे काम करावे. चांगले काय करणा-यांच्या पाठीशी सरकार उभे आहे, पण कामचुकारांना शिक्षा झाला शिवाय राहणार नाही, असेही त म्हणाले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हिंगोली येथे 4 प्रकल्प देण्यात येणार असल्याचे सांगताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, यामुळे शेतक-यांना 12 तास दिवसा वीज मिळणार आहेृ शेतक-यांची पडित जमीन भाडयाने घेऊन त्यावर हे प्रकल्प उभे राहतीलृ विदर्भ-मराठवाडयातील 325 दिवस मिळणा-या उन्हाचा उपयोग करुन हा प्रकल्प साकारणार आहेृ असे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले, शेतक-यांना वीज दयावीच लागणार त्याशिवाय हा महाराष्ट्र समध्द होणार नाही शेतक-यांनी त्यांच्याकडे असलेली विजेची थकबाकी भरावी व त्या निधीतून आपल्या भागातील वीज पुरवठयाची कामे करावी शेतक-यांकडील थकबाकीतून दंड व्याज बाजूला ठेवून मूळ रक्कमेचे हस्ते करुन देण्यास तयार आहोत टप्याटप्याने शेतक-यांनी बिल भरावे असे कळकळीचे आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी केले.

****