19 November, 2019

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू


जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

             हिंगोली,दि.19: कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हिंगोली शहर आणि पूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 20 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.
            विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी, विजयी मिरवणुका निघण्याची शक्यता आणि दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक जन्य बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे गोळा करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000


राज्यस्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन

हिंगोली, दि. 19: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली तसेच हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 19 ते 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हु. बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील 8 विभागातील औंरंगाबाद, मुंबई, पुणे, कोल्हापुर, अमरावती, नागपुर, नाशिक, लातूर अशा विभागातील मुला-मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी होणार असून साधारणत: 200 खेळाडू सहभागी होणार आहेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

16 November, 2019

राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा




राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
                         
        हिंगोली,दि.16:  जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने आज ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार सर्वश्री राकेश भट, श्याम सोळंके, प्रद्यूम्न गिरीकर, विजय पाटील, केशव जोशी, विलास जोशी , नजीर अहमद पुसेगांवकर, एहसानखान पठाण, उत्तम बलखंडे, हाफीज बागवान, सुधाकर वाढवे, श्रीरंग सिरसाट, श्रीमती शांताबाई मोरे  आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            वृत्तपत्र स्वातंत्र्याची आणि पत्रकारितेतील वृत्तपत्र स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारीतेतील उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची 16 नोव्हेंबर, 1966 रोजी स्थापन करण्यात आली. या अनुषंगाने सन 1997 पासुन दरवर्षी 16 नोव्हेंबर हा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो. यावेळी राकेाश भट, प्रद्युम्न गिरीकर आणि अरुण सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करत सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
            प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा माहिती कार्यालयातील अनिल चव्हाण, कैलास लांडगे, श्रीमती आशा बंडगर आणि परमेश्वर सुडे यांनी सहकार्य केले.

****


15 November, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी




जिल्हाधिकारी कार्यालयात
बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

हिंगोली, दि. 15 : बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

महिला लोकशाही दिनाचे 18 नोव्हेंबर रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 18 नोव्हेंबर  रोजी आयोजन
        हिंगोली, दि.15: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे.
ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि.जी. शिंदे यांनी केले आहे.

14 November, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी





जिल्हाधिकारी कार्यालयात
पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी  

        हिंगोली, दि. 14 : पंडीत  जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****


निवृत्ती वेतनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन


निवृत्ती वेतनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

            हिंगोली, दि.14:राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी व कुटुंब निवृत्ती वेतन धारकाची यादी निवृत्ती वेतन धारकाच्या आद्याक्षरी निहाय बँकेकडे पाठविण्यात आलेली आहे. निवृत्ती वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असतील त्या बँकेत त्यांनी दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हजर राहून यादीतील  त्यांचे नाव पाहून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा  ठसा उमटवावा. पुर्नविवाह तसेच पुर्ननियुक्ती बाबतची माहिती लागू असल्यास ती ही रकान्यात नोंदवावी. तसेच बायोमॅट्रीक पध्दतीनेही जीवन प्रमाण दाखला  http://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावरुन देता येईल. सदरील सुविधा उप कोषागार, कोषागार कार्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती वेतनधारक व्यक्तीस तेथे जावून या सुविधेचा वापर करता येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****