20 May, 2020

हिंगोलीत नवीन कोरोना बाधीत एका रुग्णाची नोंद


·   जिल्ह्यात एकुण 15 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली दि.20: मुंबई येथून जिल्ह्यात परतलेल्या 01 व्यक्तींस कोविड-19 ची लागण झाल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले असून त्यास क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. सदर बाधीत रुग्ण  वसमत येथील बाधीत असलेल्या रुग्णांसोबत मुंबई येथे कामाला होता.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 100 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून त्यातील 85 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

18 May, 2020

आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून बँकाचे कामकाज राहणार सुरु


आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार
आजपासून बँकाचे कामकाज राहणार सुरु

हिंगोली, दि.18: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व बॅंकाचे व्यवहार आरबीआय ने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 18 मे, 2020 पासून खातेदारांसाठी सकाळी 10.00 ते दूपारी 3.00 वाजेपर्यंत अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्थिक व्यवहार करता येणार आहे.
सर्व बँकांनी कामाची सुरुवात करण्यापूर्वी संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. गर्दी टाळण्यासाठी  एक ते दोन मिटर अंतरावर गोल/चौकोन आखण्यात यावेत. बँकेत आलेले खातेदार आखलेल्या गोल / चौकोना मध्येच उभे राहतील याचे नियोजन करावे. खातेदाराना टोकन देण्यात यावेत,   टोकन नुसारच व्यवहार करावेत. टोकननुसार नंबर आल्याची खातेदारांना माहिती होण्याकरीता Public Announcement System बसविण्यात यावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रिकामे जागेत मंडप / शामीयाना उभारून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी अधिकारी यांचे सुरक्षेसाठी मास्क सॅनीटायझराचा वापर करणेबाबत सर्व संबंधितांना सांगावे त्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. एकाच वेळी बॅंकेमध्ये  5 पेक्षा जास्त व्यक्तीस प्रवेश देवू नये. दररोज कामावर येणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्याची तसेच खातेदारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करण्यात यावी. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व हात  धुण्याची व्यवस्था व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमांचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 
या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल.  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****



जिल्ह्यातील ऑप्टीकल्स शॉप दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील ऑप्टीकल्स शॉप दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सुरक्षततेच्या सर्व उपाय योजनांचे पालन करुन जिल्ह्यातील ऑप्टीकल शॉप दररोज सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेत सुरु ठेवण्यास काही अटी व शर्तींच्या अधिन राहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  परवानगी दिली आहे.
 सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असुन यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या, हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     
*****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सिमा 31 मे पर्यंत राहणार बंद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सिमा 31 मे पर्यंत राहणार बंद

हिंगोली,दि.18:  राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरीक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील नागरीक ही हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरीक, प्रवासी यांचेमार्फत करोना विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना (कोवीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याकरीता जिल्हा सिमा बंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सिमा दि. 31 मे, 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरीक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई व इतर महानगरातुन जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकिय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
वरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी / कर्मचारी व अत्यावश्यक सेवा यांचेसाठी लागु राहणार नाहीत. सदरील आदेश दि. 18 मे, 2020 रोजी सकाळी 06.00 वा. पासून ते 31 मे 2020 चे 24.00 वाजे पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

जिल्ह्यातील हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल्स, मोबाईल शॉपी व स्टेशनरी दुकाने दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल्स,
मोबाईल शॉपी व स्टेशनरी दुकाने दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सुरक्षततेच्या सर्व उपाय योजनांचे पालन करुन सर्व प्रकारचे हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, मोबाईल शॉपी, इलेक्ट्रीकल व स्टेशनरी साहित्याचे दुकाने दररोज सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेत सुरु ठेवण्यास काही अटी व शर्तींच्या अधिन राहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  परवानगी दिली आहे.
 सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असुन यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या, हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     
****

जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत आहे. यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)  अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  
सद्यपरिस्थीती विचारात घेता किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारे दुकाने, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन / मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट संबंधीत दुकाने दररोज प्रतिदिन सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेतच सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असून यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारासाठी पिण्याच्या व हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
त्या नुसार सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही. नागरीकांची वाहने रस्त्यावर येऊ नये याकरीता आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींगचा वापर करावा.
 आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 लागू राहणार


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 लागू राहणार
हिंगोली,दि.18:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनता व त्‍यांचे आरोग्‍यास धोका असल्‍याने त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 17 मे, 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. परंतू सदरचा कालावधी आता हा दि.31 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दि. 18 मे, 2020 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 31 मे, 2020 च्या 24.00 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दी मध्ये राहणाऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू करीत असून या कालावधीत (5) पाच व त्‍या पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी जमण्‍यास किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या आदेशान्वये हिंगोली जिल्‍ह्यात सांस्‍कृतिक, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण, उत्‍सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्‍पर्धांना मनाई करण्यात येत आहे. तसेच खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्‍प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, देशातंर्गत व परदेशी सहली इत्यादीचे आयोजन करता येणार नाही. तसेच जिल्‍ह्यात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येतील असे सर्व दुकाने/सेवा आस्‍थापना, उपहार गृहे / खाद्यगृहे / खानावळ, शॉपींग कॉम्‍लेक्‍स, मॉल्‍स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब/पब क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्‍यायामशाळा, संग्रहालय तसेच सर्व प्रार्थनास्थळे (उदा. मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी) जनतेसाठी बंद राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणांशिवाय येण्‍यास मनाई करण्यात येत आहे.
सदरील आदेश खालील बाबीकरीता लागु होणार नसून, यामध्ये शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / अस्‍थापना, अत्‍यावश्‍यक सेवेतील व्‍यक्‍ती, रुग्‍णालय, पॅथॉलॉजी-लॅबोरेटरी, दवाखाना सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय (अॅलोपॅथी, आयुर्वेदीक, होमिओपॅथी), नर्सिंग कॉलेज, रेल्‍वे स्‍टेशन, एस. टी. स्‍टॅण्‍ड, परिवहन थांबे व स्‍थानके, रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप तसेच अंत्‍यविधी (कमाल 10 व्‍यक्‍तीपुरता मर्यादित राहिल), औषधालये उपहारगृहांनी योग्‍य ती सर्व खबरदारी घेवुन त्यांना खाद्यपदार्थ बनविणे, तसेच पार्सल स्‍वरुपात काऊंटर व इतर मार्गानी विक्री/वितरीत करण्‍यास परवानगी राहणार आहे. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्‍तव्‍यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्‍यविषयक आवश्‍यक ती खबरदारी घेवुन रेस्‍टॉरंटमध्‍ये खाद्यपदार्थ बनवुन देण्‍यास परवानगी राहिल. ज्‍या आस्‍थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्‍यांच्‍याकडे देश व परदेशातील अतिमहत्‍वाच्‍या (Critical-National & International Infrastructure ) उपक्रमाची जबाबदारी आहे. व सदर आस्‍थापना बंद राहिल्‍याने अशा उपक्रमांच्‍या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहु शकतील. (परंतू यादृष्‍टीने सदर आस्‍थापना कार्यरत ठेवण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात विशेषरित्‍या कळविणे बंधनकारक आहे.) तसेच प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालीके, टि.व्ही. न्‍युज चॅनेल इत्यादी) कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. अॅमेझॉन, फ्लीपकार्ट, इ. सेवा सुरु राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.  उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्यथ्‍वस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्‍वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्‍त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्‍यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्‍यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्‍टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****