26 May, 2020

हिंगोली तालूक्यातील पेहणी गाव कंटेनमेंट झोन घोषीत


हिंगोली तालूक्यातील पेहणी गाव कंटेनमेंट झोन घोषीत

हिंगोली,दि.26: जिल्ह्यातील काही भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा इतरत्र प्रादूर्भाव होवू नये, याकरीता हिंगोली तालूक्यातील पेहणी गावाचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 वरील कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.   
****



25 May, 2020

जिल्हा प्रशासनामार्फत महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

हिंगोली, दि.25: महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी ही यावेळी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
****


हिंगोलीत नवीन 8 कोरोना बाधीत रुग्ण



हिंगोली, दि.25: कळमनुरी तालुक्यात मुंबई येथून 4 तर रायगड येथून 3 आणि पुण्यातून 1 असे एकूण 8 परतलेल्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 159 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 90 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 69 कोरोना बाधीत रुग्ण भरती असून त्यांच्यावर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. तसेच  घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


24 May, 2020

हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत



हिंगोली,दि.24: जिल्ह्यातील काही भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा इतरत्र प्रादूर्भाव होवू नये याकरीता जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या कंटेनमेंट झोन मध्ये हिंगोली शहरी भागातील सिध्दार्थ नगर-जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे.
तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालूक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे गावे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.
 वरील कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.   
****



हिंगोलीत 62 कोरोना बाधीत रुग्ण



हिंगोली, दि.24: सेनगाव तालुक्यात मुंबई येथून 10 तर दिल्ली येथून 03 अशा एकूण 13 परतलेल्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
तर हिंगोलीतील लिंबाळा येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर मध्ये 31 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये 22 मुंबई येथून तर औरंगाबाद 04, रायगड 01, बिदर (कर्नाटक)  01 हून हिंगोली तालुक्यात परतले आहेत. तर 02 रुग्ण हे भिरडा येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आणि 01 समुदाय आरोग्य अधिकारी असे एकूण 31 रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
तसेच औरंगाबाद येथील रुग्णालयात 02 रुग्ण भरती आहेत. तर वसमत येथील कोरोना केअर सेंटर मध्ये 13 रुग्ण आणि हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 03 असे एकूण 62 रुग्णांवर जिल्ह्यात सद्यपरिस्थीतीत उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 151 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 89 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 62 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

23 May, 2020

हिंगोलीत 6 नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.23: मुंबई येथून वसमत तालूक्यात 5 तर  औंढा तालूक्यात 1 परतलेल्या एकुण 06 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाधीत रुग्णांना वसमत आणि औंढा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 107 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 89 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 18 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

21 May, 2020

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा


हिंगोली,दि.21: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणुन सर्वत्र पाळला जातो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
             यावेळी अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

****