24 May, 2020

हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत



हिंगोली,दि.24: जिल्ह्यातील काही भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा इतरत्र प्रादूर्भाव होवू नये याकरीता जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या कंटेनमेंट झोन मध्ये हिंगोली शहरी भागातील सिध्दार्थ नगर-जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे.
तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालूक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे गावे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.
 वरील कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.   
****



No comments: