04 May, 2020

71 जवानांचा अहवाल निगेटिव्ह



हिंगोली,दि.04:  राज्य राखीव बल हिंगोली येथील मालेगाव (नाशिक) येथे कार्यरत 71 जवानांची विशेष काळजी म्हणून 28 एप्रिल 2020 रोजी दुसरा थ्रोट स्वॅब नमुना घेण्यात आला होता. याबाबतचा अहवाल आज प्राप्त झाला असून सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.  यापूर्वी या सर्व जवानांचे 19 एप्रिल रोजी घेण्यात आलेला पहिला थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आलेला होता. आज रोजी पर्यंत जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 52 रुग्ण बाधीत आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.  कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

*****


No comments: