26 November, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

            हिंगोली, (जिमाका) दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी   निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

*****

25 November, 2021

 जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

03 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला 03 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 57 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 659 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 03 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 395 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त

महिला व बालविकास विभागाच्या वतीने सेनगाव येथे जनजागृती

        हिंगोली, दि.25 (जिमाका) :  जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना   आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने दि. 24 नोव्हेंबर, 2021 रोजी सेनगाव येथे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली. तसेच तहसील कार्यालयात माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय सेनगांवचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ.समृध्दी पाटील यांची भेट घेऊन आरोग्य शिबीरामध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच संदेश देशमुख, परमेश्वर इंगोले, सौ.वैशाली वाघ यांना माहिती पुस्तिका देऊन जनजागृती करण्यात आली.

            सेनगांव पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती. लोकडे यांची भेट घेऊन माहिती पुस्तिका व विविध विषयावर माहिती देण्यात आली.

            नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.nic.in या संकेत स्थळावर कायदेशीर प्रक्रिया व नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती  बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजने विषयीची माहिती राहुल सिरसाट (डा.ए.ऑ.) यांनी दिली. तर बालकांच्या कायद्याविषयीची माहिती क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

*****

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सव निमित्त

महिला व बालविकास विभागाच्या वतीने वसमत येथे जनजागृती

हिंगोली, दि.25 (जिमाका) :  जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिनाआझादी का अमृत महोत्सव निमित्ताने दि. 22 व 23 नोव्हेंबर, 2021 रोजी वसमत येथे तहसीलदार अरविंद बोळंगे यांची  प्रत्यक्ष भेट घेऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक व जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका देण्यात आली. तसेच तहसील कार्यालयात माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय वसमतचे वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्री.चिवळे यांची भेट घेऊन माहिती पुस्तिका देण्यात आली व विविध विषयावर माहिती देण्यात आली. तसेच जि.प.शाळा वसमत येथे बालकांचे हक्क आणि अधिकारी या विषयी माहिती देण्यात आली.

            नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.nic.in या संकेत स्थळावर कायदेशीर प्रक्रिया व नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती  बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजने विषयीची माहिती राहुल सिरसाट (डा.ए.ऑ.) यांनी दिली. तर बालकांच्या कायद्याविषयीची माहिती क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

*****

पेट्रोलपंप चालकांनी पंपावर येणाऱ्या चालकांचे

कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासूनच इंधनाची विक्री करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सर्व नागरिकांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु आजतागायत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाण फार कमी आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांनी आपल्या पंपावर येणाऱ्या चालकांना कोरोना लसीचा किमान एक डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र तपासून त्यांना इंधनाची विक्री करावी. तसेच लसीकरण न झालेल्या चालकांना तात्काळ जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घेण्याबाबत सूचित करावे. तसेच पेट्रोलपंप चालकांनी आपल्या पंपाबाहेर या आदेशानुसार लसीकरणाशिवाय इंधन विक्री नसल्याबाबत सूचना फलक लावण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं, सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, सर्व पेट्रोलपंप चालक यांची असेल.

आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.

                                                            *******

मंगल कार्यालये, लॉन्समध्ये कार्यक्रम घेण्यापूर्वी

कोरोना लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र तपासून घ्यावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सर्व नागरिकांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु आजतागायत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाण फार कमी आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स मध्ये कार्यक्रम, लग्न समारंभासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे डोस घेतले असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन्स चालकांनी आपल्या मंगल कार्यालयात, लॉन्स मध्ये नागरिकांच्या कार्यक्रमाचे, समारंभाचे आयोजन करण्यापूर्वी (बुकिंग घेण्यापूर्वी) कार्यक्रमास हजर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोना लस घेतल्याबाबतचे (किमान एक डोस) प्रमाणपत्र तपासून घेण्याची कार्यवाही करावी. तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांना तात्काळ जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घेण्याबाबत सूचित करावे. याप्रमाणे खात्री करुनच सदर कार्यक्रमाची, समारंभाची बुकींग घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स चालकांनी आपल्या मंगल कार्यालय, लॉन्स ठिकाणी या आदेशानुसार लसीकरण बाबत सूचना फलक लावण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं, सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स चालक यांची असेल.

आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.

                                                            *******

 शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांमध्ये येणाऱ्या नागरिकांना

कोरोना लसीकरण बंधनकारक

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सर्व नागरिकांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु आजतागायत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाण फार कमी आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकामध्ये येणाऱ्या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे डोस घेतले असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांनी आपल्या कार्यालयात, बँकेत नागरिकांनी प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे कोरोना लसीकरणाचा किमान एक डोस पूर्ण झाले असल्याबाबत प्रमाणपत्र पाहून खात्री करण्याची कार्यवाही करावी. तसेच ज्या नागरिकांनी कोरोना लस घेतली नाही अशांना जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करण्याबाबत सूचित करावे. लसीकरण झाल्याचे तपासणीसाठी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांनी आपल्या कार्यालयाच्या, बँकेच्या ठिकाणी या आदेशानुसार लसीकरणाबाबत सूचना फलक लावण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक हिंगोली, सर्व बँकांचे व्यवस्थापक यांची असेल.