13 September, 2019

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी


 जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी

हिंगोली, दि.13: शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये इयत्ता 6 वी च्या प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. परीक्षा दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 01.30 आहे.
यावर्षी हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतीही फी राहणार नाही . पालक हे अर्ज कुठुनही अपलोड करु शकतात. त्याकरिता पुढील काही बाबी आवश्यक आहेत- विद्यार्थी व पालकाची सही, विद्यार्थ्यांचा फोटो (फोटोची साईज ही 10-100 के.बी. मध्ये) इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सटीफिकेट, सदरहू सर्टीफिकेट हे विद्यालयाच्या वेबसाईट http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/hingoli/en/home & www.navodaya.gov.in वर डाऊनलोड लिंक मध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याची अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2019 आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तृत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईट http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/hingoli/en/home & www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहे. त्यासंबंधी अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. लक्ष्मणन यांनी केले आहे.
00000

No comments: