17 June, 2019

अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंध प्रौढ मुला मुलींनी 5 जुलै पर्यंत विविध प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन


अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंध प्रौढ मुला मुलींनी
5 जुलै  पर्यंत विविध प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
           हिंगोली,दि.17: अपंग कल्याण आयुक्तालय, पुणेमार्फत  शासनमान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग औद्योगिक  प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई  मार्फत  मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंध प्रौढ मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे, सदरील प्रशिक्षण केंद्रात प्रौढ  अस्थिव्यंगांसाठी शिवण व कर्तनकला व सौंदर्यशास्त्र, प्रौढ मुकबधीरांसाठी कॉम्प्युटर टायपिंग, डी.टी.पी., टॅली, नेटवर्कींग, प्रौढ अंधांसाठी फिजीओथेरपी प्रशिक्षण, योगा व मसाज प्रशिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व वैद्यकीय  औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे.
            तरी इच्छुकांनी  अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंध प्रौढ मुला मुलींनी किंवा पालकांनी दिनांक 5 जुलै 2019 पर्यंत प्राचार्य , तुळजाभवानी अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर समोर देगलूर, ता. देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावा  किंवा समक्ष भेटावे (मो. 9960900369, 9403207100, 9503078767) असे कर्मशाळा अधिक्षक, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर यांनी कळविले आहे.
0000000

No comments: