29 November, 2024
चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या माध्यमातून जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 29 : निराधार, अनाथ असल्यामुळे शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांचे पुनर्वसन, त्यांना मदत करणे, त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी आणि त्यांचे बालपण जपण्यासाठी धडपणारी यंत्रणा म्हणजे चाईल्ड हेल्प लाईन आहे.
जिल्ह्यात विविध भागात चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या माध्यमातून शाळा, वस्त्या वाडे, जनजागृती कार्यक्रम घेतले जातात, आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, पीडित, हरवलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह संकट ग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना मदत करण्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले आहे.
संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरिता भारत सरकार महिला व बाल विकास नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही सेवा जिल्ह्यात कार्यरत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली. चाईल्ड हेल्प लाईन 1098 संकटग्रस्त बालकांना 24x7 हेल्प लाईन सेवा उपलब्ध आहे. 1098 वर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय असते. त्यामुळे एखाद्या संकटग्रस्त बालकास मदत करण्यासाठी संपर्क करावा.
चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, धम्मप्रिया पखाले, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, तथागत इंगळे यांनी जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज, संकटग्रस्त बालकांची तात्काळ मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध समस्या असणाऱ्या बालभिक्षेकरी, लैंगिक शोषणाला बळी पडलेली बालके, हरवलेली बालके, शैक्षणिक अडचणी असलेली बालके, वैद्यकीय अडचणी असलेली बालके, बालविवाह, भावनिक आधार, शारीरिक मानसिक त्रास असलेली, करियर मार्गदर्शन, एक पालक किंवा अनाथ बालकाच्या अधिकाराचे हनन होत असल्यास त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम हे चाईल्ड हेल्प लाईन हे 1098 च्या माध्यमातून केले जाते. त्यामध्ये बालकाप्रती काम करणाऱ्या यंत्रणा, विविध सण, उत्सव, समारंभ विविध धार्मिक स्थळ यांच्यासोबत समन्वय साधून रात्रंदिवस 24x7 जनजागृती व आउटरीचच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन केले जात आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment