30 November, 2024
स्वाधारचे अर्ज ऑनलाईन पोर्टलवर भरणे बंधनकारक * नूतनीकरणासाठी 16 डिसेंबरपर्यंत मुदत
हिंगोली (जिमाका), दि. ३० : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज www.hmas.mahait.org या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्सिस्टींग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा ऑप्शन निवड करावा व इयत्ता 11 वी, प्रथम वर्षासाठी नवीन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस ऑप्शन निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार येाजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधारचा लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्र अपलोड करावीत. गतवर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाजकल्याण कार्यालयात भरलेले विद्यार्थी 2024-25 या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात. त्यासाठी पोर्टलवर एक्सिस्टींग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज दिनांक 16 डिसेंबर, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करून सदर ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयात जमा करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment