01 May, 2018

देशातील अग्रेसर राज्य म्हणुन महाराष्ट्राची ओळख -पालकमंत्री दिलीप कांबळे






देशातील अग्रेसर राज्य म्हणुन महाराष्ट्राची ओळख

                                         -पालकमंत्री दिलीप कांबळे
        हिंगोली,दि.1 : महाराष्ट्र राज्याने स्थापने पासूनच राज्याने शिक्षण, सहकार, कृषि अशा अनेक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून, त्याचाच परिणाम म्हणून आज देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास वक्फ राज्यमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री.कांबळे बोलत होते. यावेळी खासदार राजीव सातव, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी .एम. देशमुख आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
            सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपल्या जिल्ह्याचा स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, ही आनंदाची बाब असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता कटीबध्द आहे. जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास शक्य असल्याचे पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये सर्वाधिक वाटा कामगार बांधवांचा असून आज आपण कामगार दिन ही साजरा करीत आहे. त्यामुळे सर्व कामगार बांधवांचे अभिनंदन करुन पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या.
            प्रारंभी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परेड कमांडर पोलीस निरीक्षक सिध्देश्वर भोरे यांच्या समवेत पालकमंत्री श्री.कांबळे यांनी परेडचे संचलन करून मानवंदना स्वीकारली. तसेच महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन हिंगोली जिल्ह्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व जिल्हावासीयांना पालकमंत्री श्री. कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.  यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा पोलिस दल वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्त प्रकाशीत ‘नियमांचे पालन सुरक्षीत जीवन’ आणि उप प्रादेशीक परीवहन कार्यालयामार्फत ‘वाहतुकीची पाठशाला’ या माहिती पुस्तीकेचे उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महसुल, गृह विभागातील अधिकारी - कर्मचारी तसेच क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, जिल्हा पुरवठा अधिकारी तथ निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, मुख्याधिकारी रामदास पाटील, विभागीय वन अधिकारी केशव वाबळ, उप प्रादेशीक परीवहन अधिकारी अशोक पवार यांच्यासह शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

****

No comments: