24 May, 2018

मोटार सायकल संवर्गाकरिता वाहन क्रमांकाची नवीन मालिका सुरु आकर्षक वाहन क्रमांक राखीव करण्याचे आवाहन


मोटार सायकल संवर्गाकरिता वाहन क्रमांकाची नवीन मालिका सुरु
आकर्षक वाहन क्रमांक राखीव करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.24: मोटार सायकल  संवर्गाकरीताची  मालिका एम एच 38 यु  ही मालिका संपुष्टात  आल्यामुळे  उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी कार्यालयाने  मोटार सायकल  संवर्गाकरीता नवीन मालिका एमएच 38 वाय 0001 ते 9999 ही मालिका सुरु केली आहे .  ज्या वाहन मालकांना  वाहनाकरिता  आकर्षक  क्रमांक राखीव  करावयाचा  आहे .त्यांनी   उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी  संपर्क साधून  आपला आकर्षक क्रमांक  विहित शासकीय शुल्क भरुन राखीव  करुन घ्यावा, असे  आवाहन उप प्रादेशिक  अधिकारी अशोक पवार यांनी केले आहे.
0000

No comments: