15 May, 2018

महिला व युवतीकरीता हेअर स्टाईल व मेकअपवर अधारित कार्यशाळा


महिला व युवतीकरीता हेअर स्टाईल व मेकअपवर अधारित कार्यशाळा
हिंगोली, दि.15:  जिल्ह्यातील महिला व युवतींकरीता महाराष्ट्र उद्योजकता  विकास  केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली  द्वारा हेअर स्टाईल व मेकअप या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 29 ते 30 मे, 2018 या कालावधीत हिंगोली येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून  स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त  होण्याकरिता  या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण सशुल्क असून या प्रशिक्षणसाठी दि. 28 मे, 2018 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत श्रीमती. पुजा गुंडेवार, मो.क्र. (8421828104) एमसीईडी, जिल्हा कार्यालय द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक श्री. प्रसन्न रत्नपारखी, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.सी.), हिंगोली यांनी केले आहे .

0000

No comments: