15 May, 2018

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध


मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.15:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33(1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात  दिनांक 16 मे ते 14 जून 2018  पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे . 
 दिनांक 16,18 मे आणि 9,12,14 जून 2018 या दिनांकांस खालील अटीवर  गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000

No comments: