25 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता आज 69 नामनिर्देशन पत्रांचे वितरण


15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता आज 69 नामनिर्देशन पत्रांचे वितरण

            हिंगोली, दि.25: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघातून आज एकूण 34 जणांना 69 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. दि. 19 मार्च, 2019 रोजी 18 जणांना 45  तर दि. 20, मार्च, 2019 रोजी 17 जणांना 21, दि. 22 मार्च, 2019 रोजी  27 जणांना 41 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले होते. याप्रमाणे आतापर्यंत एकुण 96 जणांना 176 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. आज नऊ उमेदवरांनी  बारा नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च, 2019 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, हिंगोली यांनी कळविले आहे.
                                                                          ****

No comments: