06 November, 2019

जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतपिक क्षेत्रावरील पंचानाम्याचे काम प्रगतीपथावर - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी · 1 लाख 16 हजार 590 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण




जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतपिक क्षेत्रावरील पंचानाम्याचे काम प्रगतीपथावर
- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
·   1 लाख 16 हजार 590 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

हिंगोली,दि.06: हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतपिकांचे तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 2 लाख 25 हजार 275 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
सोमवार दि. 5 रोजी पर्यंत अतिवृष्टीमुळे हिंगोली तालूक्यातील 152 गावातील 59 हजार 160 शेतकऱ्यांचे  एकुण 33 हजार 615 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत  59 गावातील 18 हजार 662 शेतकऱ्यांचे एकुण 13 हजार 63.4 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहे. तर कळमनुरी तालूक्यातील 148 गावातील 58 हजार 296 शेतकऱ्यांचे एकुण 53 हजार 097 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत 48 गावातील 14 हजार 574 शेतकऱ्यांचे एकूण 13 हजार 274.75 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहे. वसमत तालूक्यातील 152 गावातील 42 हजार 767 शेतकऱ्यांचे एकुण 31 हजार 553 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी आतापर्यंत 80 गावातील 32 हजार 075 शेतकऱ्यांचे एकुण 23 हजार 664.75 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहे. औंढा नागनाथ तालूक्यातील 122 गावातील 37 हजार 105 शेतकऱ्यांचे एकुण 48 हजार 953 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत 49 गावातील 14 हजार 842 शेतकऱ्यांचे एकुण 19 हजार 581.2 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहेत आणि सेनगाव तालूक्यातील 133 गावातील 48 हजार 582 शेतकऱ्यांचे  एकुण 58 हजार 057 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत 104 गावातील 36 हजार 437 शेतकऱ्यांचे एकुण 43 हजार 543 हेक्टर क्षेत्रावरील पंचानामे पूर्ण झाले आहेत. असे एकुण 707 गावातील 2 लाख 45 हजार 910 शेतकऱ्यांचे एकुण 2 लाख 25 हजार 275 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी आतापर्यंत एकुण 340 गावातील 1 लाख 16 हजार 590 शेतकऱ्यांचे एकुण 1 लाख 13 हजार 126 हेक्टर क्षेत्रावरील पंचानामे पूर्ण झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार पिकांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असुन येत्या चार ते पाच दिवसात पंचनामे पूर्ण करुन शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. शासन नियमानुसार देय अनुदान शेतकऱ्यांना लवकरात-लवकर देण्याबाबत जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकही जनावर दगावले नसल्याची माहिती श्री. जयवंशी यांनी दिली.

****



No comments: