08 November, 2019

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता 14 हजार 961 पदवीधरांची नोंदणी


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता 14 हजार 961 पदवीधरांची नोंदणी

हिंगोली,दि.08: जून महिन्यात विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, त्यासाठी 1 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान हाती घेण्यात आले होते. यात  विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी 11 नोव्हेंबर 2019 पूर्वी पदवीधरांनी नमुना 18 अर्जाद्वारे आपली मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील 14 हजार 961 पदवीधरांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता आपली नोंदणी केली आहे.
            यात हिंगोली तालुक्यातील 4 हजार 037 पदवीधर आहेत. तर कळमनुरी तालूक्यातील 3 हजार 297, सेनगांव तालूक्यातील 2 हजार 044, वसमत तालूक्यातील 3 हजार 749 आणि औंढा नागनाथ तालूक्यातील 1 हजार 834 असे एकुण 14 हजार 961 पदवीधरांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता आपली नोंदणी केलेली आहे.
            मंगळवार 19 नोव्हेंबर, 2019 रोजीपर्यंत हस्तलिखिते तयार करुन प्रारुप मतदार याद्यांची छपाई करण्यात येणार असून शनिवार 23 नोव्हेंबर, 2019 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तर 23 नोव्हेंबर, 2019 ते 9 डिसेंबर, 2019 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. गुरुवार 26 डिसेंबर, 2019 रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. तर सोमवार 30 डिसेंबर, 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

****




No comments: