24 June, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन अधीन राहून लग्न समारंभास परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन अधीन राहून लग्न समारंभास परवानगी

 

        हिंगोली,दि.24: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लग्न समारंभास सामाजिक अंतराचे पालन करुन मास्कचा वापर करुन व केवळ 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ साजरा करण्यासाठी परवानगी देण्याबाबत निर्णय झाला आहे.

            सद्य:स्थितीत पावसाळा सुरु असल्याने हिंगोली जिल्ह्यातील मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ साजरा करण्यासाठी जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न समारंभ साजरा करण्यात यावा, नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, लग्न समारंभावेळी मंगल कार्यालयात सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल तसेच वातानुकुलीत मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्यात परवानगी राहणार नाही. लग्न समारंभ साजरा करण्यापूर्वी व नंतर मंगल कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. वरीलप्रमाणे नियामाचे पालन करण्याची जबाबादारी ही मंगल कार्यालयाचे मालक यांच्यासह वधू-वर पक्षाचे सर्व नागरिक यांची असेल. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या आदेशाची पालन न करणाऱ्या किंवा कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केल्याचे मानन्यात येईल. तसेच संबंधीतावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897 आणि  महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबधीतांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****


No comments: