24 June, 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दक्षता घेण्याचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दक्षता घेण्याचे आवाहन

·   विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर होणार 2 हजार रुपयपर्यंतची दंडात्मक कारवाई

           

हिंगोली,दि.24: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरत वेळी काय करावे व काय करू नये याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. ज्यामध्ये सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी, चेहऱ्यावर कायम मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे इत्यादी बाबींचे पालन करण्याच्या सूचना देवून आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिका विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते.

परंतु जिल्ह्यात नागरिक बाजारात/बाहेर फिरते वेळी विना मास्क असल्याचे तसेच काही सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक हे गरजूंना मदत वाटप करते वेळी मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यापूर्वीच्या आदेशात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकास रु. 500/- दंड अशी कार्यवाही करणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आता या कार्यालयाचे सुधारित आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकावर रु. 2 हजार दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

त्याकरीता नागरिकांनी सार्वजनिक स्थळी थुंकू नये. तसेच बाजारात/बाहेर फिरत असताना चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे व सामाजिक अंतर पाळणे इत्यादी बाबींचे पालन करावे अन्यथा त्यांचे भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

****

 


No comments: