23 June, 2020

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मागणी


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मागणी

            हिंगोली,दि.23: राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी 10 विद्यार्थ्यांकडून पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
            या शिष्यवृत्ती योजनेचा  लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत. इच्छूकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी, जि. हिंगोली येथे  दि. 25 जून, 2020 पर्यंत सादर करावे.
****

No comments: