04 July, 2017

एमआयडीसी परिसरात दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण
§  वृक्ष लागवडीबाबत दैनंदिन अहवाल वेबसाईटवर अपलोड करावा
                                             
हिंगोली,दि.4:  महाराष्ट्र शासनाने 2017 ते 2019 पर्यत या तीन वर्षांच्या कालावधीत वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सन 2017


















मध्ये 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. यावर्षी 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षी 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यासाठी करण्यात आला आहे. यावर्षी राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असताना दिनांक 1 ते 7 जूलै या कालावधीत जिल्ह्यात 7 लाख 66 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने लिंबाळा परिसरात महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये मध्ये एकूण दोन हजार वृक्षांची लागवड करण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी वृक्ष लागवडीबाबत दैनंदिन अहवाल वेबसाईटवर अपलोड करण्याच्या सुचनाही सर्व विभाग प्रमुखांना यावेळी देण्यात आली.
 शिवपार्वती पोल्ट्रीफिड प्रा. लि. येथे 250 वृक्ष लागवड , सोनी फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रिज येथे 150 वृक्षांची लागवड ,  राजेश्वरा मॅन्युफॅक्चरींग येथे 25 वृक्ष लागवड, मे. खुराणा जिनिंग ॲन्ड प्रेसिंग फॅक्टरी येथे 250 आणि इतर औद्योगीक वसाहतीत 1 हजार 325 असे एकूण 2 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी. एम. राठोड, रोजगार व स्वंयरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, उद्योग निरीक्षक जी. एम. पवार, शिवपार्वती पोल्ट्रीफिड प्रा. लि. चे संचालक ज्ञानेश्वर मामडे, सोनी फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रिजचे प्रविण सोनी, राजेश्वरा मॅन्युफॅक्चरींगचे सचिन निलावार, मे. खुराणा जिनिंग ॲन्ड प्रेसिंग फॅक्टरीचे ललितशेठ खुराणा व राजुशेठ खुराणा , जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी विवेक डावरे आदि अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी औद्योगीक वसाहतीत इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही वृक्ष लागवड करण्यात आली.

***  

No comments: