18 July, 2019

अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन


अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

हिंगोली,दि.18: महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली यांच्या व्यवस्थापनाखाली हिंगोली शहारालगत जिल्हा क्रीडा संकूल शेजारी सन २०१५ पासून अल्पसंख्यांक समुदायातील मुलींसाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असे वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता सदरील वसतिगृहाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
            या वसतिगृहाची प्रवेश क्षमता १०० असून त्यापैकी जैन, शीख, पारशी, बौद्ध, मुस्लिम या अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ७० जागा राखीव असून ३० जागा बिगर अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ज्या अल्पसंख्यांक समुदायातील कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा मुलींना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येतो. तसेच बिगर अल्पसंख्यांक समुदायातील मुलींना प्रती सत्र २ हजार ८५० रुपये शुल्क आकारण्यात येते.
            वसतिगृहात आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी, चौवीस तास विद्युत, अभ्यासासाठी टेबल, खुर्ची, आंतर-गृही व मैदानी खेळाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच महिन्यातून एकदा वैद्यकीय तपासणी केली जाते. तरी या वसतिगृहात उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत-जास्त मुलींनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले आहे .
****







No comments: