11 January, 2021

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

·   सन 2019-20 साठी शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेतंर्गत रिअपील करणे

 

हिंगोली,दि.11(जिमाका): सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी (mahadbt) पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. त्यावर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती /फ्रिशिप योजनांकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले जात आहेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु.जाती, विमुक्त्जाती भटक्या, इतर प्रर्वगातील विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायीक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजुर करणे या योजनेतंर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी रि-अपील करण्यासाठी सन 2020-21 या करीता नवीन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि.03 डिसेंबर, 2020 पासून सुरू करण्यात आले आहे.

या योजनेकरीता अर्ज करण्याची अंतिम दि . 31 जानेवारी, 2021 असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्तीचे अर्ज संकेतस्थळावरतीभरुन ते ऑनलाईन पध्दतीने आपल्या महाविद्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. तसेच महाविद्यालयांनी सदरचे अर्ज छाननी करुन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचेंच अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.   

 महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत होत असलेले अर्ज हे महाविद्यालयाद्वारे या कार्यालयास प्राप्त होतात. परंतु या पैकी नॅान आधार असलेले अर्ज हे देयक बनविण्यासाठी पात्र होत नाहीत. यात नोंदणीकृत अर्ज NOT ALLOTED होण्याचे प्रमुख कारण हे नॉन आधार अर्ज असे आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील अर्जांची ऑनलाईन तपासणी करतांना सर्व महाविद्यालयानी भरलेल्या अर्जाचा प्रोफाईल प्रकार आधार बेस आहे की नाही याची खात्री करुनच फारवर्ड करावा. तसेच नॉन आधार अर्जाबाबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या बाबत अवगत करावे.

 तसेच ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नॉन आधार अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राफाईलमधील आधार क्रमांक अद्यावत करावा. तसेच आधार संलग्नीकृत बँक खाते आहे की नाही याची खातरजमा या https://residen.uidai.gov.in/bank-mapper या लिंकद्वारे करुन घ्यावी. अशा सूचना आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना देण्यात यावी, असे  आवाहन  समाज  कल्याण सहाय्यक  आयुक्त शिवानंद मिनगीरे केले आहे.

****

           

 

 

 

No comments: